jayant patil news : काल मध्यरात्री वर्षा बंगल्यावर काय घडले?

SHARE:

काल मध्यरात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आमदार जयंत पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल अचानक वर्षा बंगल्यावर पोहोचले. यावरून महाविकास आघाडीत फूट पडल्याचे वृत्त पसरताच जयंत पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील ईश्वरपुर नगराध्यक्ष अपात्रतेच्या मुद्द्यावर भेट घेतल्याचे स्पष्ट करत तेथे तटकरे पटेल आले होते का हे माहित नसल्याचे पाटील यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांची जयंत पाटील यांनी भेट घेतली. त्यानंतर शदर पवार यांचा राष्ट्रवादी एनडीएसोबत जाणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसल्या. अशावेळी महाविकास आघाडीत फुट पडणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या भेटीबद्दल जयंत पाटील यांनी सांगितले की, मी सीएमची वेळ घेतली होती त्यामध्ये थोडेफार मागेपुढे झाले.

त्यांच्या केबिनमध्ये जाऊन चहा घेतला. सीएम आले त्यांनी विचारलं काय झालं त्यावर माझ्या मतदार संघातील नगराध्यक्षाला अपात्र ठरवण्यात आल्याचा मुद्दा त्यांना सांगितले.यावर मुख्यमंत्री म्हणाले मी माहिती घेतो. त्या आधी मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा प्रयत्न केला ते दिल्लीत होते. त्यांचा फोन बंद होता. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना पाच दहा मिनिटे भेटलो.

प्रथमता मी हॉलमध्ये बसलेलो. ते बर्‍याच वेळाने आले. तेव्हा त्यांची भेट झाली. त्यावेळी सीएम म्हणाले गडबड सुरू आहे. मिटिंग सुरू आहे. काय आहे.तेव्हा मी माहिती दिली. तेव्हा ते म्हणाले, मी दोन दिवसात माहिती घेऊन सांगतो. आम्ही अपील करणार असल्याचं सांगितलं.अशी माहिती पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली. पाटील पुढे म्हणाले नगरविकास मंत्र्यांकडे अपील करावं लागतं. पण नगरविकास मंत्री नव्हते. मी हॉलमध्ये एकटाच होतो. तिथे तटकरे आले हे मला माहीत नाही.

मी घरी आल्यावर फुटबॉलची मॅच पाहत होतो. त्यावेळी अशा बातम्या सुरु असल्याचे मेसेज आले. म्हटलं सकाळी बोलू.अशी माहिती पाटील यांनी दिली. विलिनीकरणाच्या चर्चेशी काही संबंध नाही. मी फक्त नगराध्यक्ष अपात्र ठरल्याचं कारण होतं. मी त्यांना भेटलो. प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे वर्षा बंगल्यावर होते, याबाबत आपल्याला काहिही माहिती नसल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *