sangli crime news : बिसूरमध्ये स्वतःच्या घरातच दागिन्यांवर डल्ला मारणारे दोघे जेरबंद

SHARE:

sangli crime news : बिसूरमध्ये स्वतःच्या घरातच दागिन्यांवर डल्ला मारणारे दोघे जेरबंद : मिरज तालुक्यातील बिसूर येथे कौटुंबिक कारणातून स्वतःच्याच घरात घरफोडीचा बनाव करत मित्राच्या मदतीने सोन्याचे दागिने आणि महागड्या मोबाईलवर डल्ला मारणार्‍या सराईत दोघांना पोलिसांनी अटक केली. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने शहरातील कॉलेज कॉर्नर परिसरात सदरची कारवाई केली.

sangli crime news : बिसूरमध्ये स्वतःच्या घरातच दागिन्यांवर डल्ला मारणारे दोघे जेरबंद

7 लाख 39 हजारांचा मुद्देमाल जप्त : स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई.

या प्रकरणी दीपेश बाळासो पाटील (वय 25 रा. दर्गा परिसर, बिसूर) आणि महेशकुमार खंडेराव पाटील (वय 39 रा. ग्रामपंचायत जवळ, बिसूर) या दोघांना अटक केली आहे. दोघांकडून सोन्याचे दागिने, दीड लाखांचा आयफोन आणि एक मोबाईल असा एकूण 7 लाख 39 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

याबाबत अधिक माहिती अशी कि, शनिवार दि. 11 जुलै रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4 या कालावधीत मिरज तालुक्यातील बिसूर येथील दिपश्री बाळासो पाटील या कामानिमित्त बाहेर गेल्या असता त्यांच्या घरी चोरी झाली होती. चोरट्याने घरात कोणी नसल्याचे पाहून घराचा दरवाजा उघडून आतील दागिने लंपास केले होते. याबाबतची फिर्याद सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात रविवारी नोंदविण्यात आली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.

गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकातील कर्मचार्‍यांना माहिती मिळाली कि, पोलिसांच्या रेकॉर्डवरील दोघेजण सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी सांगलीतील कॉलेज कॉर्नर परिसरातील एका हॉटेलनजीक येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याठिकाणी सापळा लावला असता संशयित दीपेश पाटील आणि महेशकुमार पाटील हे दोघेजण त्याठिकाणी थांबल्याचे दिसले. यावेळी त्यांना ताब्यात घेत त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे सोन्याचे दागिने आढळून आले.

यावेळी दागिन्यांबाबत दोघांकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता दिपेश पाटील याने त्याचा मित्र महेशकुमार पाटील याच्या मदतीने स्वत:च्याच घरातील दागिने चोरल्याची कबुली दिली. यानंतर दोघांकडून 5 लाख 85 हजार रुपये किमतीचे 34 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, दोन अंगठ्या, 1 लाख 34 हजार रुपयांचा आयफोन आणि 20 हजार रुपये किमतीचा एक मोबाईल असा एकूण 7 लाख 39 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

सदरची कारवाई पोलिस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक निरीक्षक प्रशांत निशानदार, रुपाली बोबडे, कर्मचारी सुभाष सूर्यवंशी, राजाराम मुळे, अतुल माने, सुशील मस्के, सुमित सूर्यवंशी, ऋतुराज होळकर, कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर यांच्या पथकाने केली. दरम्यान, संशयित दोघेजण पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार अरुण त्यांच्यावर यापूर्वी शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *