jayant patil news : टेबलावर वजन ठेवल्याशिवाय काम होत नाही… माजी मंत्री जयंत पाटील यांनी अधिकार्‍यांना सुनावले…

SHARE:

jayant patil news : टेबलावर वजन ठेवल्याशिवाय काम होत नाही… माजी मंत्री जयंत पाटील यांनी अधिकार्‍यांना सुनावले… : वाळवा तहसील कार्यालयात टेबलावर वजन ठेवल्याशिवाय काम होत नाही. मात्र अधिकार्‍यांनी हे लक्षात ठेवावे वाळवा तालुक्यात भ्रष्टाचार खपवून घेतला जात नाही. या तालुक्याला गृहीत धरून कोण काम करू नये, कारण हा सुजाण जनतेचा तालुका आहे. पुन्हा सांगितलं नायं असे म्हणू नका, अशा शब्दांत माजी अर्थमंत्री आमदार जयंत पाटील यांनी वाळवा तालुक्यातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचार्‍यांना इशारा दिला आहे

jayant patil news : टेबलावर वजन ठेवल्याशिवाय काम होत नाही… माजी मंत्री जयंत पाटील यांनी अधिकार्‍यांना सुनावले…

पुन्हा सांगितले नव्हते, असे म्हणू नका म्हणत भरला दम..!

ईश्वरपूर येथील शासकीय कार्यक्रमात बुधवारी एक राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा क्षण पाहायला मिळाला. सत्ताधारी आमदार सदाभाऊ खोत व्यासपीठावर उपस्थित असतानाच माजी अर्थमंत्री आ. जयंत पाटील यांनी वाळवा तहसील कार्यालयातील कथित भ्रष्टाचारावर थेट प्रहार करत अधिकार्‍यांना जाहीर इशारा दिला. त्यांच्या आक्रमक वक्तव्याने सभागृहात एकच खळबळ उडाली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य अभियान कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले. विशेष म्हणजे, हे भाषण सुरू असताना व्यासपीठावर आमदार सदाभाऊ खोत, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

शासकीय कार्यक्रमातच महसूल विभागाच्या कामकाजावर एवढ्या स्पष्ट शब्दांत टीका झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. जयंत पाटील यांच्या वक्तव्यामुळे वाळवा तहसील कार्यालयातील कामकाज आणि कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, संबंधित यंत्रणा यावर काय भूमिका घेते याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

कार्यक्रमास माजी मंत्री सदाभाऊ खोत, माजी आमदार भगवानराव साळुंखे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीता पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, हुतात्मा संकुलाचे नेते गौरव नायकवडी, जिल्हा परिषद सदस्य जयराज पाटील, अभिजित पाटील, सागर खोत, ईश्वरपूरचे नगराध्यक्ष, आनंदराव मलगुंडे, उपनगराध्यक्ष, खंडेराव जाधव, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार सारिका रासकर, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील, पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांची हे उपस्थित होते.

या शिबिरामध्ये तालुक्यातील अपंग, वंचित, निराधार नागरिक तसेच महसूल विभागाशी संबंधित विविध प्रलंबित कामांचा आढावा घेऊन अनेक प्रश्नांचे जागेवरच निराकरण करण्यात आले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *