sangli crime news : कसबे डिग्रजजवळ व्हेल माशाची 4 कोटी 50 लाखांची उलटी जप्त : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथून व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करत ज्यादा दराने विक्रीसाठी आलेल्या एका तरुणास जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. या तरुणांकडून एकूण 4 किलो 521 ग्रॅम वजनाची 4 कोटी 52 लाख 11 हजार रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी (अंबरग्रिस) जप्त केले आहे.
sangli crime news : कसबे डिग्रजजवळ व्हेल माशाची 4 कोटी 50 लाखांची उलटी जप्त
सांगली ग्रामीण पोलिसांची कारवाई.
सांगली ग्रामीण पोलिसांच्या पथकाने कसबेडिग्रज गावच्या हद्दीत सदरची कारवाई केली. या प्रकरणी अमोल आकाराम सिद (वय 31 रा. घुणकी ता. हातकणंगले) याला अटक केली असून त्याने मालवण येथील निखिल नावाच्या व्यक्तीकडून सदरचे अंबरग्रिस आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
महागातल्या महाग परफ्युममधील सुगंध टिकवण्याबरोबरच अन्य काही गोष्टीसाठी व्हेल माशाच्या उलटीचा पदार्थ वापरला जातो. हा पदार्थ दुर्मिळ असून समुद्राच्या पाण्यावर तरंगताना कधीतर आढळतो. त्यामुळे त्याची किंमत कोटीच्या घरात असते. सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील कर्मचार्यांना माहिती मिळाली कि, संशयित अमोल सिद हा व्हेल माशाच्या अंबरग्रिसची तस्करी करून विक्रीसाठी मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज नजीक ग्रीन पार्क प्लॉटिंगजवळ आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पथकाने त्यातिलकानी सापळा लावून अमोल सिद या संशयीताकडून सुमारे 4 किलो 521 ग्रॅम वजनाचा हा पदार्थ जप्त केला आहे. त्याची बाजारभावाने किंमत 4 कोटी 52 लाख 10 हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक चौकशीत संशयित अमोल याने हा पदार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील निखिल नामक व्यक्तीकडून आणला असल्याची कबुली दिली आहे.
आपण हा पदार्थ विक्रीसाठी घेऊन येत होतो, असेही त्याने पोलिसांना सांगितले. या कारवाईदरम्यान पोलिसांनी त्याने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी ( एमएच09 एफ झेड 7268) जप्त केली आहे. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई सांगली ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अभिजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवाजी देशमुख, अरुण अवताडे, सहाय्यक पोलीस फौजदार मेघराज रुपनर, हवालदार सचिन खाडे, महेश जाधव,अभिजीत पाटील, हिम्मत शेख,योगेश यादव,अमित पाटील तसेच वन विभागाकडील कर्मचारी गणेश बबनराव भोसले, सुधीर वसंत सोनवणे यांच्या पथकाने केली. दरम्यान, संशयित अमोल सिद याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











