sangli news : जिल्ह्यात एसआयआरमधून तब्बल 3.81 लाख मतदार वगळले : जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची (एसआयआर) प्रक्रियेनुसार सोमवारी प्रारुप मतदारयादी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी प्रसिद्ध केली. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात 25 लाख 73 हजार मतदारांना अर्ज वाटप करण्यात आले होते. त्यापैकी 21 लाख 91 हजार 70 मतदारांनी आपले प्रपत्र भरुन दिले आहे. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात दुबार, मयत आणि स्थलांतरित अशा तब्बल 3 लाख 81 हजार 930 मतदार वगळले आहेत.
sangli news : जिल्ह्यात एसआयआरमधून तब्बल 3.81 लाख मतदार वगळले
दुबार, मयत, स्थलांतरित मतदारांचा समावेश, जिल्ह्यात 21.91 लाख मतदार
प्रारुप मतदार यादीवर 30 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत आहे. तर 4 नोव्हेंबरला रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
‘एसआयआर’अंतर्गत घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन प्रपत्र भरून घेण्याची प्रक्रिया 17 ऑगस्ट रोजी पूर्ण झाली. त्यानंतर मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण, पुनर्रचना आणि प्रारूप मतदार याद्या तयार करण्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळापत्रकात सुधारणा करण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचनेचे काम 24 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात आलेे.
त्यानंतर 31 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात राबविलेल्या मोहिमेत 25 लाख 73 हजार मतदारांना अर्ज वाटप करण्यात आले होते. त्यापैकी 21 लाख 91 हजार 70 मतदारांनी आपले प्रपत्र भरुन दिले आहे.
आठ विधानसभा मतदारसंघात दुबार, मयत आणि स्थलांतरित अशा तब्बल 3 लाख 81 हजार 930 मतदार वगळण्यात आले आहे. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांना आपल्या नावाची नोंद तपासता येणार असून, नाव वगळले असल्यास किंवा अन्य काही त्रुटी आढळल्यास दावे व हरकती दाखल करता येतील. 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत.
प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट नसलेले नागरिक तसेच 1 ऑक्टोबर 2026 रोजी किंवा त्यापूर्वी 18 वर्षे पूर्ण करणारे नवमतदार मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज क्रमांक 6 सादर करू शकतील. हा अर्ज ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने दाखल करता येणार आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी प्रारूप मतदार यादी तपासून आपले नाव आहे की नाही, याची खात्री करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
31 ऑगस्ट ते 29 ऑक्टोबर या कालावधीत नोटिसांवरील कार्यवाही तसेच प्राप्त दावे व हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करून 4 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.
जिल्ह्याची प्रारुप मतदार यादी
– मतदारसंघ पुरुष महिला एकूण
– मिरज (अ.जा.) 147830 146686 294539
– सांगली 136370 138195 274600
– इस्लामपूर 123651 119377 243037
– शिराळा 141913 134737 276654
– पलूस कडेगांव 128149 125280 253436
– खानापूर 158810 153558 312383
– तासगांव-क.महांकाळ 141652 134280 275934
– जत 136671 123814 260487
– एकूण 1115046 1075927 2191070
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










