kavtepiran crime news : कवठेपिरानमध्ये भरधाव कारची दुचाकीला धडक : अपघातात तरुण गंभीर जखमी.

SHARE:

kavtepiran crime news : कवठेपिरानमध्ये भरधाव कारची दुचाकीला धडक : अपघातात तरुण गंभीर जखमी. : मिरज तालुक्यातील कवठेपिरान ते दुधगाव जाणार्‍या मार्गावर रस्त्याकडेला उभ्या असलेल्या दुचाकीस्वाराला भरधाव कारने जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार आदित्य जगदीश येवले (वय 21 रा. कवठेपिरान) हा गंभीर जखमी झाला. सदरचा अपघात हा शुक्रवार दि. 28 ऑगस्ट रोजी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास झाला.

kavtepiran crime news : कवठेपिरानमध्ये भरधाव कारची दुचाकीला धडक : अपघातात तरुण गंभीर जखमी.

या प्रकरणी आकाश तानाजी येवले (वय 29 रा. कवठेपिरान) यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून कार चालक राजेंद्र भुजाप्पा गाजी (वय 62 रा. कुपवाड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी आकाश येवले यांचा पुतण्या जखमी आदित्य येवले हा आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील कवठेपिरान गावामध्ये राहतो. शुक्रवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास जखमी आदित्य येवले हा दुधगाव ते कवठेपिरान जाणार्‍या मार्गावर त्याची मोटारसायकल (क्र. एमएच 10 डीए 7145) घेऊन रस्त्याकडेला उभा होता.

यावेळी संशयित कार चालक राजेंद्र गाजी हे त्यांच्या ताब्यातील कार (क्र. एमएच 10 डीजी 4938) हि भरधाव वेगात चालवून समोरून येवले याच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात आदित्य येवले याच्या डोक्याला, डोळ्याला आणि दोनही पायांना मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला. अपघातानंतर आदित्य येवले याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी आकाश येवले यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित कार चालक राजेंद्र गाजी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *