miraj news : जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांच्या ताकदीची लढत: मंगळवार फैसला मिरज पंचायत समितीतून : जिल्हा परिषदेचा सत्तेचा मार्ग

SHARE:

miraj news : जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांच्या ताकदीची लढत: मंगळवार फैसला मिरज पंचायत समितीतून : जिल्हा परिषदेचा सत्तेचा मार्ग : मिरज पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती निवडणुकीच्या स्थगितीचा निर्णय आज सोमवारी होण्याची शक्यता असली तरी निश्चित वेळापत्रकानुसार मंगळवारी होणार्‍या निवडणुकीसाठी जोरदार राजकीय हालचालींना प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांच्या ताकदीचा अंदाज या निवडणुकीत येणार आहे . मंत्री जयकुमार गोरे यांनी यापूर्वी केलेल्या प्रतिज्ञेनुसार जिल्हा परिषदेत सत्ता आणायची असेल तर मिरज पंचायत समितीची निवडणूक भाजपला जिंकावीच लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या सत्तेचा मार्ग मिरज पंचायत समितीमधूनच जाणार आहे हे पुन्हा एकदा दिसून येणार आहे.

miraj news : जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांच्या ताकदीची लढत: मंगळवार फैसला मिरज पंचायत समितीतून : जिल्हा परिषदेचा सत्तेचा मार्ग

सांगली जिल्ह्यात महायुतीची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी मुंबईतील भाजपच्या वरिष्ठांनी मिरज पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुकीची जबाबदारी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याबरोबरच मंत्री जयकुमार गोरे यांच्या खांद्यावर टाकली. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत बहुमत नसतानाही शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा पक्षाला चितपट करून भाजपचा अध्यक्ष सातारा जिल्हा परिषदेमध्ये बसविण्यात आला. हीच जमेची बाजू लक्षात घेऊन जयकुमार गोरे यांना सांगलीत धाडण्यात आले आहे.

ही निवडणूक महायुती विरोधात महाविकास आघाडी अशी झाली तरच भाजपला फायदा होणार आहे. महाविकास आघाडीचे नेते आमदार जयंतराव पाटील, खासदार विशाल पाटील, आ. डॉक्टर विश्वजीत कदम यांची भाजप , शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा पक्ष यांच्यात महायुती होऊ नये यासाठीची रणनीती आहे, तर भाजप नेते शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा पक्षाला बरोबर घेऊन घेऊनच निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत.

22 सदस्यांच्या मिरज पंचायत समितीमध्ये महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे तीन, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे चार सदस्य आहेत गेल्या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदेसेना, राष्ट्रवादी अजितदादा पक्षाला आपल्याकडे खेचण्यात महायुतीला यश आल्यामुळे राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेचा एक सदस्य असे मिळून महाविकास आघाडीने सदस्य संख्या अकरावर नेली .

पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीसाठी बारा सदस्य हवे किंवा विरोधी भाजप आघाडीतील एक सदस्य गैरहजर राहायला हवा, अशीच रणनीती गेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रचली होती , आणि बुधगावचे सदस्य पांडुरंग इंगळे अनुपस्थित राहिल्यामुळे भाजपकडे केवळ 10 आणि महाविकास आघाडीकडे 11 सदस्य असे बलाबल होऊन काँग्रेसच्या तन्वी कमलेकर मिरज पंचायत समितीच्या सभापती झाल्या , तर उपसभापतीपदाची माळ महायुती सोडून आलेल्या शिंदे सेनेच्या शेजुळ यांच्या गळ्यात पडली.

आता राजकारण बदलले आहे , सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतील दांडगाव्याचा अनुभव असलेले मंत्री जयकुमार गोरे मैदानात उतरले आहेत , पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि आ. डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी या वेळेला विरोधकांना चारीमुंड्या चीत करण्याच्या तयारीने व्यूहरचना केली आहे मिरज पंचायत समिती सभापतीच्या निवडीत महायुती करण्यात भाजपला यश आले तर राष्ट्रवादी अजितदादा पक्षाचे तीन आणि शिंदेसेनेचे दोन असे मिळून महायुतीची सदस्य संख्या पंधरावर जाते तर महाविकास आघाडीची सदस्य संख्या केवळ सातभर येऊन पोहोचते. विजयासाठी बारा या मॅजिक नंबरची गरज आहे आणि महायुतीच्या विजयासाठी ती पुरेशी आहे.

त्यामुळे वातावरणाचा अंदाज आल्याने महाविकास आघाडीने निवडणूक स्थगितीसाठी याचिका दाखल केली आहे. त्याचा निकाल आज सोमवारी लागण्याची शक्यता आहे , अन्यथा 4 ऑगस्टला निवडणूक होणार हे निश्चित आहे. मिरज पंचायत समिती सभापती निवडीत महायुती करण्यात जर भाजपला यश आले तर त्याचे परिणाम जिल्हा परिषदेवर होणारे आहेत . जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अध्यक्ष निवडीच्या वेळी राष्ट्रवादी अजितदादा पक्षाने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता, शिंदे सेनेचे दोन सदस्य अनुपस्थित ठेवून महाविकास आघाडीने जिल्हा परिषद निवडणूक जिंकली होती .

यावेळी जर राष्ट्रवादी अजितदादा पक्षाने ऐनवेळी भाजपला पाठिंबा दिला तर महायुतीची सदस्य संख्या 31 वर जाणार आहे . 61 सदस्यांच्या सांगली जिल्हा परिषदे महाविकास आघाडीची सदस्य संख्या 30 आहे. त्यामुळेच महायुती झाली आणि जिल्हा परिषदेत शिंदेसेना, राष्ट्रवादी अजितदादा पक्ष सर्व सदस्यांसह एकत्र आले तर महाविकास आघाडीला झटका बसणार आहे त्याचीच पहिली पायरी मिरज पंचायत समितीची सभापती निवडणूक आहे असे जिल्ह्याच्या राजकारणात चर्चिले जात आहे

मिरज पंचायत समितीत
महायुती झालीच तर. …
भारतीय जनता पक्ष 10
राष्ट्रवादी अजितदादा पक्ष 3
शिवसेना 2
एकूण 15
बहुमतासाठी आवश्यक 12

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *