iswarpur news : नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांनी पुन्हा नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला

SHARE:

iswarpur news : नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांनी पुन्हा नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला : उरुण ईश्वरपूर नगरपालिकचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांनी नगरसेवक व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या जल्लोषात पुन्हा नगराध्यक्ष पदाचा पदभार स्विकारला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष शहाजी पाटील यांनी पुष्पहार देवून त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपनगराध्यक्ष खंडेराव जाधव, गटनेत्या सौ.अरुणादेवी पाटील,माजी नगराध्यक्ष सुभाषराव सूर्यवंशी,सभापती एल.एन.शहा, सभापती संदीप माने आदींनी त्यांना पुष्पगुछ देवून अभिनंदन करताना शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची अतिषबाजी करून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. तसेच माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या नावाच्या घोषणांनी परिसर दणणून सोडला.

काही दिवसापूर्वी सांगली जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्या पेठ-सांगली रस्त्यालगत च्या एका जागेच्या अतिक्रमणाच्या तक्रारीवरून त्यांना नगराध्यक्ष पदावरून पदमुक्त केले होते. याबदत श्री.मलगुंडे यांनी नगर विकास खात्याकडे सांगली जिल्हाधिकारी यांच्या निर्णया विरोधात दाद मागितली होती. यानंतर माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे नगर विकासखात्याचे मंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे शिष्टाई केली होती. काल नगर विकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी सांगली जिल्हाधिकारी यांच्या निर्णयास स्थगिती दिली आहे. काल रात्री कार्यकर्त्यांनी शहरात मोठा आंनदोत्सव साजरा केला आहे.

आज सकाळी लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांनी नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसत पुन्हा पदभार स्विकारला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष शंकरराव चव्हाण,नगरसेवक संग्राम पाटील,शिवाजी जाधव,स्वरूप मोरे, पुष्पलता खरात,मनिष कुरळपकर,जावेद इबुशे, माजी नगरसेवक आयुब हवलदार,बाळासाहेब कोळेकर,मनिषा पेठकर,युवक कार्याध्यक्ष अभिजित कुर्लेकर,अभिमन्यू क्षीरसागर,परेश पाटील,रविंद्र वाघमोडे,दत्ता फल्ले,अंकुश जाधव, विक्रम घाडगे,सुहास पाटील,मोहन भिंगार्डे,राजू खरात,धनाजी देशमुख यांच्यासह नगरसेवक व कार्यकर्त्यांनी आनंदराव मलगुंडे यांना पुष्पगुछ देवून अभिनंदन केले,शुभेच्छा दिल्या.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *