जिल्हा बँक निवडणुकीसाठी 2445 मतदार

SHARE:

जिल्हा बँक निवडणुकीसाठी 2445 मतदार

68 मतदार वाढले, अंतिम यादी प्रसिद्ध

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन 2026 ते 2031 या कालावधीतील संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. विकास सेवा संस्थांसह इतर शेती, पाणीपुरवठा, खरेदी विक्री संघ, नागरी बँका व पतसंस्था तसेच औद्योगिक प्रक्रिया, औद्योगिक मजूर संस्थांसह 2445 मतदारांचा समावेश आहे. वाळवा तालुक्यातील सर्वाधिक 584 मतदार आहेत. काही संस्थांनी त्यांचे शेअर्स भांडवल पूर्ण केल्याने 68 संस्था पात्र ठरल्या. त्यामुळे नव्याने 68 मतदारांची वाढ झाली. जिल्हा बँकेची अंतिम मतदार यादी जाहीर झाल्याने पंधरा दिवसात बॅँकेचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे.
जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर यांनी प्रारुप यादी प्रसिद्ध केली. विकास सेवा संस्थांसह इतर शेती, पाणीपुरवठा, कृषी पणन, खरेदी विक्री संघ, नागरी बँका व पतसंस्था तसेच औद्योगिक प्रक्रिया, औद्योगिक मजूर संस्थांसह 2445 मतदारांचा समावेश आहे. विकास सेवा संस्थांचे जिल्ह्यातून सर्वाधिक 778 मतदार आहेत. इतर शेती, दूध, पशु पैदास, कुक्कुटपालन, पाणीपुरवठा संस्थांच 345, कृषी पणन संस्था, शेतमाल प्रक्रिया संस्था, खरेदी विक्री संघ आणि साखर कारखाने यांचे 94 मतदार, नागरी बँका, पतसंस्था व नोकरांच्या सहकारी संस्था 765 याशिवाय ग्राहक संस्था, गृहनिर्माण संस्था, औद्योगिक प्रक्रिया, उत्पादन संस्था व औद्योगिक मजूर संस्थासह व्यक्तिगत 463 मतदार आहेत. मतदार यादीत वाळवा तालुक्यातील सर्वाधिक 451 आणि त्यापाठोपाठ मिरज तालुक्यातील 433 मतदार आहेत.
जिल्ह्यातील अवसायानातील संस्था, नोंदणी रद्द, शेअर्स अपूर्ण आणि बँकेच्या थकबाकीदार अशा तब्बल 200 संस्थांना मतदार यादीतून वगळण्यात आले होते. प्रारुप मतदार यादीवर तब्बल 273 हरकती दाखल झाल्या होत्या. या सर्व हरकतींवर निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक महेश कदम यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यानंतर निर्णय देण्यात आला. अपुरे शेअर्स असलेल्या संस्थांनी शेअर्स भांडवल पूर्ण केले आहे. तर अन्य काही संस्थांनीही थकबाकी भरली आहे. त्यामुळे बॅँकेच्या अंतिम मतदार यादीत 68 मतदार वाढण्याची शक्यता आहे. जिल्हा बॅँकेची अंतिम मतदार यादी शुक्रवारी जाहीर झाल्यानंतर नियमानुसार पंधरा दिवसात बॅँकेची निवडणूक प्रक्रिया सुरु होणार आहे.
गणेशोत्सवानंतर जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु होणार आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून लवकरच निवडणूक निर्णय अधिकार्‍यांची नियुक्ती केली जाणार आहे.

जिल्हा बँक अंतिम मतदार यादी

  • संस्था ः मतदार संख्या
  • विकास सेवा सोसायटी ः 775
  • दूध, पशु पैदास, कुक्कुटपालन, पाणीपुरवठा संस्था ः 331
  • कृषी पणन, खरेदी विक्री संघ, साखर कारखाने ः 87
  • नागरी बँका, पतसंस्था, नोकरांच्या पतसंस्था ः 735
  • ग्राहक, गृहनिर्माण, औद्योगिक प्रक्रिया, औद्योगिक मजूर संस्था ः 449
  • एकूण ः 2377
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *