सांगली संस्थानमध्ये चोर गणपतीची प्रतिष्ठापणा.

SHARE:

सांगली संस्थानमध्ये चोर गणपतीची प्रतिष्ठापणा.

सांगली संस्थानच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी :

श्री गणपती पंचायतन संस्थानच्या ’चोर’ गणपतीची आज पहाटे प्रतिष्ठापना झाली. चोर पावलांनी येणारा गणपती म्हणून हा सांगलीच्या गणपती पंचायतन संस्थानचे हे गणपती प्रसिद्ध आहेत. 1844 पासून सुरु झालेला हा संस्थानचा गणेश उत्सव आजही तेवढ्याच दिमाखात साजरा केला जातो. आणि या गणेश उत्सवाचे विशेष आकर्षण असते तो ’चोर गणपती’. चोर गणपतीच्या आगमनानंतर आता संस्थानच्या गणेशोत्सवाला सुरवात झाली आहे.

श्री गणपती पंचायातान संस्थानच्या ’ चोर गणपती’ ची प्रतिष्ठापना करून गणेश उत्सवास मोठ्या दिमाखात प्रारंभ झाला आहे. भाद्रपद प्रतिपदेला मंदिरातील गाभार्‍यात दोन्ही बाजूस चोर गणपतीच्या मूर्ती विधीपूर्वक बसविण्यात आल्या आहेत. चोर गणपती म्हणजे चोर पाऊलानी येउन बसणारा गणपती. उत्सव सुरु करताना इथले तत्कालीन राजे चिंतामणराव पटवर्धन यांची दूरदृष्ठी किती होती त्याचा प्रत्येय आज येतो. 1848 पासून कागदाच्या लगद्या पासून गणपती बनवण्याची संकल्पना राबविणारा राजा काळाच्या किती पुढे होता याची चुणूक दिसते. ही परंपरा पुर्वापार चालत आल्याने संस्थानच्या या चोर गणपतीच्या प्रतिष्ठापनेला फार मोठे महत्त्व असते. या प्रतिष्ठापनेपासून गणपती संस्थानाच्या गणेश उत्सावास प्रारंभ होतो. विशेष म्हणजे चोर गणपतीचे फार मोठे महात्म्य आहे ह्या दोन्ही गणपतीच्या मुर्त्या ह्या कागदी लगद्या पासून बनविलेल्या आहेत आणि 200 वर्षे झाली तरी अजून त्या सुखरूप आहेत. या चोर गणपतीची प्रतिष्ठापना कधी होते हे कोणालाही माहित माहित नसते म्हणून या गणपतीला चोर गणपती असे संबोधले जाते. उत्सवानंतर मूर्ती सुरक्षितस्थळी ठेवण्यात येतात.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *