माहुत इस्माईल चाचा आणि माधुरीची भावनिक भेट ठरली लक्षवेधी

SHARE:

माहुत इस्माईल चाचा आणि माधुरीची भावनिक भेट ठरली लक्षवेधी

महादेवी’ उर्फ माधुरी हत्तीण वर्षानंतर नांदणी मठात दाखल

नांदणी (ता.शिरोळ) येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य संस्थान मठाची महादेवी उर्फ माधुरी हत्तीण तिच्या स्वगृही परतल्यानंतर शनिवारी पहाटेपासूनच तिला पहाण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील भाविकांची गर्दी उसळली होती. तब्बल वर्षानंतर ती परत आल्यानंतर माहुत इस्माईल चाचा यांच्याशी गेल्या 10 वर्षापासून जुळलेला स्नेह पुन्हा तसाच दिसून आला. माधुरीसाठी उभारण्यात आलेल्या सोयीसुविधा तिचा दिनक्रम हा निश्चत करून त्याप्रमाणे तिला खाण्या-पिण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

उच्चास्तरीय समितीच्या परवनगीनंतर वनतारा येथुन माधुरी हत्तीणीचे शुक्रवारी रात्री 12.40 च्या सुमारास नांदणी येथील गांधी चौकात आगमन झाले. आगमन सोहळ्यात उपस्थित हजारोंच्या जनसमुदायाने तिचे जंगी स्वागत केले. त्यानंतर 1.50 च्या सुमारास निशिधीकेजवळ अ‍ॅनिमल अ‍ॅम्बुलन्समधुन तिला उतरविण्यात आले. त्यानंतर तिचे स्वागत करून माधुरी निवासस्थानात मंगल प्रवेश करण्यात आला. प्रवेशानंतर स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी तिला जवळ घेताना अश्रु अनावर झाले होते.
दरम्यान शनिवारी पहाटेपासून माधुरी पाहण्यासाठी व तिचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्र राज्यासह उत्तर कर्नाटकांतील सर्वधर्मियांनी मोठी गर्दी केली होती. मात्र सुरक्षिततेच्या कारणास्तव याठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिक लांबूनच माधुरीचे दर्शन घेत होते. दिवसभर या परीसरात भाविकांची गर्दी होती.
वनतारा येथील दिनक्रम नांदणी येथे सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार माधुरीच्या खाण्या-पिण्यापासून, स्वच्छता, आरोग्य यांची काळजी घेतली जात आहे. याबरोबर 32 तासांच्या प्रवासानंतर तिला विश्रांतीसाठी चांगला वेळ दिला आहे. दुपारी 1 च्या सुमारास स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी व प.पु. धर्मकिर्ती स्वामीजीच्या उपस्थितीत माधुरीसाठी उभारण्यात आलेल्या स्विमिंग टँकमध्ये तिला पोहण्यासाठी सोडण्यात आले होते. यावेळी माधुरी हत्तीण स्विमिंग टँकमध्ये नेल्यानंतर तिने पोहण्याचा आंनद घेतला. सुमारे तासभर पोहल्यानंतर तिला पुन्हा निवसस्थानी नेवून विश्राती देण्यात आली.
कोल्हापूराच्या माधुरीची आम्ही एक वर्षापासून खुप काळजी घेतली आहे. तिच्या खाण्यापासून व्यायामाचे नियोजन दिनक्रम ठरविला आहे. वनताराच्या टिमने अनुभव, वेळ, प्रेम, वैद्यकीय सेवा दिल्यामुळे ती आज अंत्यत चांगली आहे. सध्या माधुरी नव्या रुपात आली असून नांदणी येथे माधुरीसाठी नवीन सेंटर सोयीनियुक्त उभारण्यात आले आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *