pune padvidhar election : अरुण लाडांनी मुलाची समजूत काढावी

SHARE:

pune padvidhar election : अरुण लाडांनी मुलाची समजूत काढावी : गेल्या विधान परिषद निवडणुकीत पुणे पदवीधर मतदार संघातून आमदार अरुण लाड यांनी लढण्याआधी भैय्या माने यांना शब्द दिला होता. ‘आता त्यांनी शब्द पाळायला व मुलगा शरद लाड यांची त्यांनी समजूत काढावी, असा सल्ला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिला.

pune padvidhar election : अरुण लाडांनी मुलाची समजूत काढावी

हसन मुश्रीफ ः राष्ट्रवादीचा ‘अश्वमेधचा घोडा’ आता थांबणार नाही

पुणे पदवीधर मतदार संघासाठी मतदार नोंदणी मेळाव्यासाठी ते सांगलीत आले होते. मेळाव्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी भैय्या माने, राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे आदी उपस्थित होते.

ना. मुश्रीफ म्हणाले, पुणे पदवीधर मतदार संघातून राष्ट्रवादीतर्फे भैय्या माने लढतील, हे आम्ही स्पष्ट केले आहे. भाजपने ही जागा मागितली तरी आम्ही त्यांना समजून सांगू. कारण, माने यांचे शिक्षण क्षेत्रातील काम प्रभावी आहे. जेन-झीचे प्रश्न समजून घेण्याची ते सोडवण्याची त्यांची क्षमता आहे. गेल्यावेळी त्यांनी माघार घेतली, कारण अरुण लाड यांनी आग्रह केला आणि शब्द दिला होता. त्यावेळी राष्ट्रवादीने निवडणूक जिंकली होती आणि त्यामुळे या जागेवर राष्ट्रवादीचाच हक्क असल्याचा दावा त्यांनी केला.

जिल्ह्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून निधी वाटपात दुजाभाव होत असल्याची तक्रार मेळाव्यात झाली. त्याबाबत ना. मुश्रीफ म्हणाले, ‘‘ज्या पक्षाच्या हातात देश आहे, त्यांनी छोट्या पक्षांबाबत असे वागू नये. मी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी याबाबत बोलणार आहे. त्यांनी निधीत राष्ट्रवादीला चांगला सन्मान द्यायला हवा. मी भविष्यात राष्ट्रवादीकडून सांगली जिल्ह्याचे संपर्कमंत्रीपद घेण्याचा विचार करतोय. मला ते बरे पडेल, असेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचा अश्वमेध भाजपला थांबणार नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचा यावेळचा उमेदवार कोण असेल हे माहिती असल्यानेच शरद लाड यांनी भाजपचा रस्ता धरला. परंतू, राष्ट्रवादीचा अश्वमेध यज्ञाचा घोडा आता सुटलेला आहे. तो काही थांबणार नाही, भाजपदेखील त्याला थांबवण्याचा प्रयत्न करणार नाही, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *