mangaon murdar news : माणगावमध्ये अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील माणगावमध्ये 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. काल (17 ऑक्टोबर) रोजी रात्री नऊच्या सुमारास सांस्कृतिक भवनासमोरील मंदिर परिसरात ही घटना घडली. या घटनेमुळे माणगाव परिसरात खळबळ उडाली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तपासासाठी फॉरेन्सिक पथकासह श्वान पथकालाही पाचारण करण्यात आलं. संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून शोधमोहीम राबवण्यात येत आहे.
mangaon murdar news : माणगावमध्ये अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या
आरोपीला माणगावातच फाशीची शिक्षा द्या, गावकर्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
दरम्यान, अवघ्या नववीमधील अल्पवयीन मुलीला संपवल्यानंतर गावकर्यांनी एकच आक्रोश केला. ग्रामस्थांनी पोलिसांसमोर आक्रोश करत आरोपीला माणगावातच फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी केली. ग्रामस्थांकडून मोर्चा काढून संताप व्यक्त केला. यावेळी मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग होती. मोर्चेकरी महिलांनी हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी करण्यात आली.
मुलगी नववीच्या वर्गात शिकत होती

माणगाव येथील सांस्कृतिक भवनासमोरील मंदिर परिसरात शनिवारी रात्री ही घटना घडली. संबंधित मुलगी नववीच्या वर्गात शिकत होती. मंदिर परिसरात असताना संशयिताने तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केला. तिच्या दंडावरही वार करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या मुलीला तातडीने इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
घटनेची माहिती मिळताच हातकणंगले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी फॉरेन्सिक पथकाला बोलावण्यात आलं. तसेच संशयिताचा माग काढण्यासाठी श्वान पथकाची मदत घेण्यात आली. या प्रकरणातील संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवली.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










