iswarpur murdar news : लग्न मोडल्याच्या वादातून ईश्वरपुरमध्ये तरुणाचा खून

SHARE:

iswarpur murdar news : लग्न मोडल्याच्या वादातून ईश्वरपुरमध्ये तरुणाचा खून : लग्न मोडल्याच्या आणि कापड दुकानात झालेल्या किरकोळ वादातून एका तरूणाचा कोयता व चॉपरने वार करून खून केल्याची घटना रविवारी मध्यरात्री ईश्वरपूरमधील कामेरी नाका परिसरात घडली. या प्रकरणी दोन संशयिताविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.

iswarpur murdar news : लग्न मोडल्याच्या वादातून ईश्वरपुरमध्ये तरुणाचा खून

या प्रकरणी घटनास्थळ व पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार मृत तरूण सूरज महादेवा कांबळे (वय 31) आणि दोन संशयितांचा कापड दुकानात रविवारी रात्री आठ वाजणेच्या सुमारास किरकोळ वाद झाला. यावेळी हा वाद मिटवण्यात आला. मात्र, सूरज कामेरी नाका परिसरात आल्यानंतर त्याच्यावर संशयितांनी चॉपर व कोयत्याने वार केले.

मध्यरात्री साडेअकरा वाजणेच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सूरजला उपचारासाठी रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना आज पहाटे चार वाजणेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात संशयिताविरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आणि मृत यांच्यात पुर्वी लग्न मोडल्याच्या कारणावरून वाद धुमसत होता. त्यातच कापड दुकानात झालेल्या किरकोळ वादाने आगीत तेल ओतले. यातूनच चिडून संशयितांनी त्याचा धारदार हत्याराने वार करून खून केला.

या घटनेनंतर संशयित पसार झाले असून त्यांच्या शोधासाठी पोलीसांची पथके तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी दिली.र सभेची 14 संचालकांची गणपूर्ती आवश्यक आहे. ही संख्या पूर्ण न झाल्याने बोलावण्यात आलेली पहिली बैठक तहकूब करण्यात आली होती. यानंतर समविचारी आघाडीने समांतर सभा घेत शशिकांत पाटील चुयेकर यांची अध्यक्षपदी निवडणूक कली होती.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अधिक वाचा