iswarpur news : मार्लेश्वर येथे दर्शनासाठी गेलेल्या कापूसखेड येथील सहा वर्षीय बालिकेचा डोंगरावरून कोसळलेला दगड डोक्यात पडून दुर्दैवी मृत्यू : मार्लेश्वर तीर्थक्षेत्रात दर्शनासाठी गेलेल्या कापूस खेड तालुका वाळवा येथील सहा वर्षीय बालिकेचा डोंगरावरून कोसळलेला दगड डोक्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवारी (दि.13) दुपारी बाराच्या सुमारास घडलेल्या या घटनेत बालिकेचे वडील आणि काकाही जखमी झाले आहेत. ऋत्वी संदीप पाटील (वय 6) असे मृत बालिकेचे नाव आहे. या घटनेमुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
iswarpur news : मार्लेश्वर येथे दर्शनासाठी गेलेल्या कापूसखेड येथील सहा वर्षीय बालिकेचा डोंगरावरून कोसळलेला दगड डोक्यात पडून दुर्दैवी मृत्यू
हसण्या-खेळण्याच्या आणि बागडण्याच्या वयातच ऋत्वीने जगाचा निरोप घेतल्याने रुग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. देवस्थानात दर्शन घेऊन कुटुंबीयांच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना केली होती; मात्र दर्शनानंतर काही वेळातच काळाने घाला घातल्याने पाटील कुटुंबातील महिलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. ऋत्वीच्या पश्चात आई-वडील, मोठी बहीण अन्विता, काका-काकू आणि चुलत भावंडे असा परिवार आहे.

शवविच्छेदनानंतर ऋत्वीचे पार्थिव सायंकाळी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेचा देवरुख पोलीस अधिक तपास करीत आहेत. हसण्या-खेळण्याच्या आणि बागडण्याच्या वयातच ऋत्वीने जगाचा निरोप घेतल्याने रुग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. देवस्थानात दर्शन घेऊन कुटुंबीयांच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना केली होती; मात्र दर्शनानंतर काही वेळातच काळाने घाला घातल्याने पाटील कुटुंबातील महिलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
ऋत्वीच्या पश्चात आई-वडील, मोठी बहीण अन्विता, काका-काकू आणि चुलत भावंडे असा परिवार आहे. शवविच्छेदनानंतर ऋत्वीचे पार्थिव सायंकाळी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेचा देवरुख पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










