sangli bank news : महाविकास आघाडीकडे बहुमताचा आकडा, मात्र भाजप नेत्यांकडून जोरदार फिल्डिंग

SHARE:

sangli bank news : महाविकास आघाडीकडे बहुमताचा आकडा, मात्र भाजप नेत्यांकडून जोरदार फिल्डिंग : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडी 18 नोव्हेंबरला होणार आहेत. महाविकास आघाडीकडे सद्यस्थितीत बहुमताचा आकडा असला तरी भाजपने अध्यक्ष पदासाठी मिळविण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. एकीकडे आघाडीचा अध्यक्ष होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे, परंतु कोणत्याही परिस्थितीत अध्यक्षपद खेचण्यासाठी भाजप नेत्यांकडून गेमप्लॅन आखला जात आहे. त्यामुळे अध्यक्ष आघाडीचा होणार की भाजपचा होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

sangli bank news : महाविकास आघाडीकडे बहुमताचा आकडा, मात्र भाजप नेत्यांकडून जोरदार फिल्डिंग

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 21 पैकी 15 जागा आधीच बिनविरोध झाल्या होत्या, तर उर्वरित 6 जागांच्या मतमोजणीत राजकीय दिग्गजांनी वर्चस्व राखले. निवडणुकीनंतर अध्यक्षपदासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासून 15 दिवसांच्या आत अध्यक्षांची निवड करणे प्रशासकीयदृष्ट्या बंधनकारक असल्याने 18 नोव्हेंबरला नवीन अध्यक्षांची निवड होणार आहे.मात्र, संचालक मंडळातील बदललेल्या समीकरणांमुळे ही निवड सर्वसंमतीने होणार की राजकीय संघर्षातून, याबाबत तर्कवितर्क लढविल जात आहेेत.

बँकेची निवडणूक पक्षीय पातळीवर लढली गेलेली नाही. तरीही महाविकास आघाडीकडे सद्यस्थितीत दहा जागा आहेत. असे असले तरी अजितदादा राष्ट्रवादीचे संचालक रणधीर नाईक हे महाविकास आघाडीसोबत राहणार असल्याचे संकेत आहेत. तर महायुतीचे नेते हे सत्तेचे गणित आमच्याकडे असल्याच्या दावा करीत आहेत. तासगाव सोसायटी गटातून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी खासदार संजयकाका पाटील आणि कवठेमहांकाळ सोसायटी गटातून निवडून आलेले माजी मंत्री अजितराव घोरपडे यांची भूमिका महायुतीच्या सत्तेसाठी निर्णायक ठरणारी राहिल.

मागील आठवड्यात भाजपच्या नूतन संचालकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यांनी बँकेत शेतकर्‍यांसाठी पारदर्शी कारभार करण्याबरोबरच सत्तेसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या आदेशानंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह भाजपमधील जिल्ह्यातील नेते रिचार्ज झाले आहेत. बँकेचे अध्यक्षपद कशाप्रकारे पदरात पडेल यासाठी व्युव्हरचना आखली जात आहे. त्यामुळे महायुती की महाविकास आघाडीची सत्ता येणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, महाडीकांचा अध्यक्षपदाचा दावा

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा निर्णय काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना यांच्या सर्वपक्षीय समन्वयातून व एकमताने घेतला जाईल, अशी भूमिका मांडली आहे. याउलट, भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी अध्यक्ष निवडीत भाजपची भूमिका अत्यंत निर्णायक ठरणार असल्याचा दावा केल्याने चुरस आणखी वाढली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *