rajkiyalive

पंचकल्याण पुजेतील मानाचा हत्ती बेडकिहाळच्या उषाराणी हत्तीचे निधन; अंत्यदर्शनासाठी गर्दीचा महापूर

 

पंचकल्याण पुजेतील मानाचा हत्ती बेडकिहाळच्या उषाराणी हत्तीचे निधन; अंत्यदर्शनासाठी गर्दीचा महापूर : संपूर्ण जैन समाजातील कोणतीही पंचकल्याणक पुजा असो बेडकिहाळच्या उषाराणी हत्तीला मानाचे स्थान असते. बेडकिहाळच्या हत्तीशिवाय कोणतीही पंचकल्याण पूजा अपूर्णच असायची, अशा या बेडकिहाळच्या उषाराणी हत्तीचे निधन झालेे. समडोळीत नुकत्याच झालेल्या पंचकल्याण पुजेत बेडकिहाळच्या हत्तीचे अनेकांनी सवाल धरून गावातून मिरवणूक काढली होती.

पंचकल्याण पुजेतील मानाचा हत्ती बेडकिहाळच्या उषाराणी हत्तीचे निधन; अंत्यदर्शनासाठी गर्दीचा महापूर

बेळगाव जिल्ह्यातील निपाणी तालुक्यातील बेडकिहाळ येथील पाटील मळ्यात उषाराणी हा मानाचा हत्ती गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्यास होता. जैन धर्मातील अतिशय तीर्थ असलेल्या श्री क्षेत्र कोथळी कुप्पानवाडी ट्रस्टचा हा उषाराणी हत्ती वय 52 . या हत्तीचे शनिवार 10 ऑगस्ट रोजी निधन झाले. आचार्यरत्न देशभूषण महाराज यांनी कोथळी कुप्पानवाडी ट्रस्टसाठी त्या वेळी हत्तीचे पिल्लू आणले होते.

बेडकिहाळ येथील पाटील यांच्या मळ्यातील खास करून बनविण्यात आलेल्या हत्तीचे वास्तव्य गृहातच राहत असे. त्यामुळे बेडकिहाळ व परिसरातील नागरिकांना त्याचा विशेष लळा लागला होता. उषाराणीच्या निधनाची बातमी कळताच बेडकिहाळ, शमनेवाडी, चाँदशिरदवाड, बोरगाव व कोथळी कुप्पानवाडी परिसरातील नागरिक तसेच महिला उषाराणीचे अंत्य दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. तर या वेळी बर्‍याचजनांना अश्रू अनावर झाले.

या वेळी नांदणी मठाचे प.पू.जीनसेन भट्टारक पट्टाचार्य महा स्वामीजी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली. त्याच बरोबर उपस्थितांनी उषाराणीच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. माहूत बासू लक्ष्मीश्वर हे करत होते. उषाराणी हत्ती आजवर शेकडो पंचकल्याण महापूजेत सहभागी झाली होती. तर बेडकिहाळचे ग्राम दैवत सिद्धेश्वरांच्या वर्षातून होत असलेल्या तिन्ही पालखी सोहळ्यात सहभागी होऊन पालकिस पुष्पहार अर्पण करून मानवंदना देत असे.

उषाराणी हत्तीने शेकडो पंचकल्याण महापूजे सह बर्‍याच धार्मिक कार्यक्रमासह इतर कार्यक्रमात सहभागी होती, तर जाणता राजा महानाट्य मालिका व अनेक सिनेमा या हत्तीने काम केले आहे. रविवारी सायंकाळी क्रेनच्या सहाय्याने खुल्या ट्रकमध्ये मृत देह ठेऊन वाद्यांच्या गजरात गावांतून उषाराणीची मिरवणूक काढण्यात आली व कोथळी येथे विधिवत्तपणे अंत्यसंस्कार करण्यात आले. हत्तीच्या निधनाच्या अंत्यसंस्कार करण्यासाठी शासकीय वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते,यावेळी चिक्कोडी निपाणी तालुक्यातील जैन धर्मीयांसह इतर नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज