rajkiyalive

diliptatyapatil news : दिलीपतात्यांचा राजकारणातील उद्वेग योग्यच

diliptatyapatil news : दिलीपतात्यांचा राजकारणातील उद्वेग योग्यच

दिनेशकुमार ऐतवडे 9850652056

diliptatyapatil news : दिलीपतात्यांचा राजकारणातील उद्वेग योग्यच : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे मुलुखमैदान तोफ, माजी मंत्री जयंत पाटील यांचे विश्वासू शिलेदार शेलारमामा यांनी राजकारणातील सुरू असलेल्या गटारगंगेवर भाष्य करीत राजकारणाला रामराम ठोकला. सध्याच्या परिस्थितीत राजकारणात रमणे त्यांना आवडले नाही. त्यांनी ज्या प्रकारे राजकारणारवर भाष्य केले, त्यांचा उद्वेग योग्य असल्याचे अनेकांनी बोलून दाखविले.

diliptatyapatil news : दिलीपतात्यांचा राजकारणातील उद्वेग योग्यच

वाळव्याच्या मातीत तयार झालेल्या दिलीपतात्यांवर कासेगावच्या राजारामबापूंच्या विचारांचा जबरदस्त पगडा होता. अगदी लहान वयातच तात्यांना राजारामबापुंचा सहवास लाभला. दिलीपतात्यांबरोबर जिल्ह्यातील आणि राज्यातील अनेक तरूण राजारामबापुंसोबत काम करण्यासाठी धडपडत होते. दिलीपतात्यांची राजकारणातील आवड आणि समाजकारण करण्याची जबरदस्त इच्छाशक्ती पाहून राजारामबापू पाटील यांना आपल्या कारखान्यात संचालक पदावर काम करण्याची संधी दिली. वयाच्या 19 व्या वर्षी एखाद्या साखर कारखान्यावर संचालक म्हणून निवड होणे हा विक्रम आजही अबाधीत आहे.

दिलीपतात्यांनी मिळालेल्या या पदाचा केवळ गवगवा केला नाही तर भागातल्या शेतकर्‍यांना त्यांच्या उत्पन्नवाढीसाठी काय काय करता येते यासाठी कारखान्याच्यावतीने प्रयत्न केले. पुढे राजारामबापूंच्या अकाली निधनाने वाळवा तालुक्यात मोठी पोकळी निर्माण झाली. परंतु राजारामबापुंच्या विचारांचा वारसा पुढे चालवायचा या हेतूने त्यांनी अमेरिकेत शिकत असलेल्या जयंत पाटील यांना कारखान्याच्या चेअरमनपदावर विराजमान करण्यासाठी पुढाकार घेतला. तेथून आजपर्यंत दिलीपतात्या आणि जयंत पाटील ही जोडी कधीही दूर गेली नाही.

जयंत पाटील यांच्या सात विधानसभा निवडणुकीतील धनुष्यबाण कायमच दिलीपतात्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. प्रत्येक गावात जावून तरूणांच्यात नवचैतन्य निर्माण करणे, त्यांना विकासासाठी एकत्र करणे, बेरोजगारांच्या हाताला काम देणे, महिलांच्या हाताला काम देणे असे एक ना अनेक कामे त्यांनी राजारामबापू उद्योग समुहाच्यावतीने केले. जयंत पाटील यांनीही त्यांना जिल्हा बँकेच्या चेअरमनपदावर काम करण्याची संधी दिली. तात्यांनी जयंत पाटील यांचा हा विश्वास सार्थ ठरविला.

diliptatyapatil-news-diliptatys-enthusiasm-for-politics-is-justified

परंतु गेल्या पाच वर्षात राज्यातील आणि जिल्ह्यातील राजकारण पार बदलून गेले आहे. आज एखादा नेता एखाद्या पक्षात आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल. एवढी अनिश्चितता राजकारणात आले आहे. आयुष्यभर एकमेकांच्या विरोधात राजकारण करणारे पक्ष आज सत्तेसाठी एकत्र येवून जनतेची दिशाभूल करीत आहेत. आमदारकीच्या तिकीटासाठी अनेकजण रातोरात पक्ष बदलत आहेत हे सर्व पाहून दिलीपतात्यांना त्यांना पूर्वीचे दिवस आठवले.

पूर्वीच्या काळात विचारावर चालणारे राजकारण असायचे. एखाद्या पक्षावर निष्ठा ठेवली की आयुष्यभर त्या पक्षाशी बांधीलकी ठेवायची. अनेकांना विरोधकांकडून प्रलोभने यायची परंतु कोणीही त्याला बळी पडायचे नाहीत. सध्याची पिढी बदलली आहे. सध्या एआयचे युग आले आहे. माणसांच्या विचाराला किंमत नाही त्याहून पुढे राजकारणाची गटारगंगा झाली आहे. सध्याच्या मंत्रीमंडळातील अनेक मंत्री अनेक पक्ष बदलून आलेले आहेत. त्यामुळे सध्याच्या राजकारणात मन रमत नाही, असे म्हणत तात्यांनी राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केला. एकंदरीत आजची परिस्थिती पाहता तात्यांचा हा राजकारणाबद्दलचा उद्वेग योग्यच आहे असे म्हणण्याची पाळी आली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज