पंचकल्याणिकाबरोबर संस्कार, शिक्षण आणि आरोग्यावर समाजाने धन खर्च करावे
jain samaj news : जैन समाजाचे प्रश्न व विकासयोजना शासन दरबारी मांडणार- अध्यक्ष भालचंद्र पाटील सांगली : पुणे विभागातील जैन समाज हा पंथभेद न मानता एकत्र येऊन दक्षिण भारत जैन सभेला पाठबळ देत आहे. ही ऐक्य भावना वृध्दीगंत करुन समाजाला निर्भयता देण्यासाठी समाज संवाद मेळाव्यातून सभेचे सभासद वाढवून मोठया प्रमाणात समाजाला सभेच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जैन समाजाच्या एकत्र कुटुंबातील विभाजनामुळे शेती गुंठ्यावर आली, शिक्षण परवडत नाही आणि शस्त्रक्रिया व औषधोपचार हे सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. अशा परिस्थितीत पंचकल्याणक पूजेवर वारेमाप खर्च न करता जैन समाजाने दक्षिण भारत जैन सभेच्या संस्कार, शिक्षण व आरोग्य उपक्रमांना दान द्यावे.
jain samaj news : जैन समाजाचे प्रश्न व विकासयोजना शासन दरबारी मांडणार- अध्यक्ष भालचंद्र पाटील
समाजाला सुसज्ज भव्य हॉस्पिटलची गरज आहे. पुणे मुंबईत कार्यालय, वसतिगृहांची आवश्यकता आहे. समाजाला भेडसावणार्या प्रश्नांचा निपटारा करणे हे दक्षिण भारत जैन सभेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. कोट्यवधींचे उत्सव करताना जैन समाजातील शेवटच्या घटकांना मदत करणे ही सामुदायिक जबाबदारी आहे. गेली सव्वाशे वर्षे दक्षिण भारत जैन सभा याच विचाराने वाटचाल करीत आहे. पुणे मुंबई सारख्या महानगरात जैन समाज मोठ्या संख्येने आहे.
इथे समाजासाठी शिक्षण व आरोग्य आणि सुसंस्कार महत्वाचे आहेत.
हा समाज दक्षिण भारत जैन सभेच्या प्रवाहात येण्यासाठी सभेचे सभासद आणि मुखपत्र प्रगती आणि जिनविजयचे वर्गणीदार वाढविण्याचा संकल्प केला आहे. पुणे मधून याकामी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. असे प्रतिपादन द.भा.जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी केले. पुण्यातील हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग मध्ये आयोजित पुणे विभागातील जैन समाज संवाद मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
प्रारंभी वाकडच्या शालिनी जैन या मुलींने नृत्याविष्कारातून मंगलाचरण सादर केले. पुणे विभागातर्फे दक्षिण भारत जैन सभेच्या पदाधिकार्यांचे पंचारतीने ओवाळून औक्षण करण्यात आले . मान्यवरांनी प्रथमाचार्य श्री शांतीसागर महाराजांच्या प्रतिमेसमोर दिपप्रज्वलन करुन वंदन केले.
भालचंद्र पाटील पुढे म्हणाले, ’सुसंस्कृत पिढी निर्माण करण्यासाठी गाव तेथे पाठशाळा उपक्रम सुरू आहे.
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातून शासकीय सेवा परिक्षांची तयारी करुन घेतली जाते. देणगीदारांच्या पाठबळावर उच्च शिक्षणातील गरीब जैन मुलांसाठी दत्तक पालक योजनेतून भरीव आर्थिक मदत केली जाते. जैन समाजाच्या सर्व पंथातील बेरोजगार मुलांना रोजगार मिळवून देण्यासाठी नोकरी मेळाव्याचे मार्गदर्शन केले जाते.
पंचकल्याणकवर मर्यादित खर्च करुन शिल्लक रकमेच्या दहा टक्के सभेच्या शिक्षण कार्याला मदत करा.
दहा हजार नवीन सभासद व प्रगतीचे वर्गणीदार करण्याचा संकल्प केला आहे. सभेच्या प्रवाहात सहभागी व्हा आणि ऐक्य व बंधुभाव वृध्दीगंत करा मंदिरासमोर दानपेटीबरोबर ’ड्रॉप बॉक्स फॉर जॉब’ ठेऊन समाजातील गरजू मुलांना नोकर्या कशा मिळतील यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्याची सुरुवात पुणे येथून झाली आहे.
तत्पूर्वी मुख्यमहामंत्री डॉ. अजित पाटील यांनी प्रास्ताविकामध्ये दक्षिण भारत जैन सभेच्या स्थापनेपासूनचा सर्वांगिण कार्याचा संक्षिप्त आढावा घेतला. यावेळी चेअरमन रावसाहेब पाटील म्हणाले, सभेचे सभासद व्हा, एकत्र या, आपली ताकद वाढते.. आपल्या समाजातील बेरोजगारी कमी झाली पाहिजे.
या संवाद मेळाव्यात व्हा. चेअरमन दत्ता डोर्ले यांनी सभेच्या कर्नाटकमधील कार्याचा तर खजिनदार संजय शेटे यांनी सभेच्या एकूण आर्थिक परिस्थिती व विविध फंडाविषयी उपस्थितांना माहिती दिली. यावेळी सौ. स्वरूपा पाटील -यड्रावकर, सुजाता शहा, डॉ. सुरेंद्र गांधी, डॉ. कल्याण गंगवाल, अरविंद जैन, प्रकाश बडजात्या, शुभांगी पाटील, प्रिती पाटील, चंद्रकांत पाटील, शितल दोशी, शुभम बिंदगे, भरत पाटील, प्रतिमा पाटील, राजश्री शेटे, सुखमल जैन, अभय जैन, यांनी मनोगतात मौलिक सूचना मांडल्या.
त्यामध्ये जैन तंटामुक्ती योजना, पुण्यामध्ये सभेचे कार्यालय, विद्यार्थी वसतिगृह आणि सभागृह निर्माण व्हावे, कराड परिसरात विद्यार्थिनींसाठी श्राविकाश्रम सुरू व्हावे, जैन तंटामुक्ती योजना सुरू व्हावी, पाठशाळा अभ्यासक्रमात अमुलाग्र बदल व हायटेक व्हावे, अल्पसंख्यांक आणि शिष्यवृत्ती योजनांची सविस्तर माहिती समाजाला मिळावी, महिलांच्या आर्थिक विकासासाठी योजना, जैन इतिहासाच्या संरक्षणाबरोबरच विचारांचे संगोपन व्हावे.जैन क्षेत्र-मंदिरांवर हल्ले होत आहेत त्यांच्या संरक्षणांसाठी पाऊले उचलावीत
सभेसाठी आपण काय करू शकतो याचाही विचार प्रत्येकांनी करावा, अल्पसंख्यांक मेडिकल महाविद्यालय आणि कॅन्सर हॉस्पिटल उभारणीची आवश्यकता, पुणे विद्यापीठातील जैन चेअरमध्येही सभेने लक्ष द्यावे, सभेने आता ऑनलाईन डिजीटल व्हावे.तसेच दक्षिण भारत जैन सभेचा अल्पसंख्याक दाखला शैक्षणिक, शासकीय व निमशासकीय कामकाजात ग्राह्य धरला जावा. इ. मुद्द्यावर मनोगते झाली.
यावेळी सभा आणि प्रगति अंकाचे 250 हून अधिक सभासद व वर्गणीदार झाले. पीएसआय श्रीकांत पाटील, जयजिनेंद्र सोसायटी, उद्योजक सुदीन खोत, चंदुकाका सराफचे अतुल शहा, बिल्डर शितल दोशी, अजित पाटील (निगडी पंचकल्याणिक पूजेच्या शिल्लक निधीतून) यांनी सभेला बृहत्दान दिले.
या समाजसंवाद मेळाव्यात अनिल बागणे, राजकुमार चौगुले, विजयआण्णा कासार, डॉ. महावीर अक्कोळे, शशिकांत राजोबा, मोहन नवले, सुरेश रोटे, विजयकुमार शेट्टी, उदय लेंगडे, निश्चल दोशी, राजेंद्र पाटील, पुष्पा पाटील, संतोष डुडू, आण्णासो पाटील, सुमित जैन, पुण्यामधील 27 जिनमंदिरचे ट्रस्टी, विविध संस्थांचे पदाधिकारी, श्रावक-श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत उपाध्यक्ष मिलिंद फडे तर आभार महामंत्री अजित पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. एन.डी.बिरनाळे व अमित जैन यांनी केले.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.