rajkiyalive

jayant patil news : शेतकर्‍यांच्या उत्पादनवाढीसाठी प्रतीक पाटील यांचा सभासद संपर्क दौरा

jayant patil news : शेतकर्‍यांच्या उत्पादनवाढीसाठी प्रतीक पाटील यांचा सभासद संपर्क दौरा : ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या शेतातील ऊसाचे एकरी उत्पादन वाढवावे असे प्रतिपादन राजारामबापू साखर कारखान्याचे चेअरमन प्रतिकदादा पाटील यांनी केले. प्रतीक पाटील यांच्या सभासद संपर्क दौर्‍याचा शुभारंभ सुरू झाला असून, भर पावसातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

jayant patil news : शेतकर्‍यांच्या उत्पादनवाढीसाठी प्रतीक पाटील यांचा सभासद संपर्क दौरा

प्रतीक पाटील म्हणाले, आपण राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकर्‍यांना आधुनिक तंत्रज्ञान व विविध योजना उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच आरोग्य व आपल्या मुलांच्या शिक्षणा साठी विविध सोई-सुविधा सुरू केल्या आहेत. आपण कारखान्याच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आपले एकरी उत्पादन वाढवावे,असे आवाहन राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांनी सभासद संपर्क दौर्‍यात ऊस उत्पादक शेतकर्‍यांना केले.

प्रतिकदादा पाटील यांनी ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या अडी-अडचणी समजून घेण्यासाठी माणिकवाडी,महादेववाडी या गावातून सभासद संपर्क दौरा सुरू केला आहे. या दौर्‍यात माजी जि.प.अध्यक्ष, कारखान्याचे संचालक देवराज पाटील, संचालक अतुल पाटील,सचिव डी.एम. पाटील,मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील, जलसिंचन अधिकारी जे.बी.पाटील, गटाधिकारी नितीन पाटील सहभागी झाले होते. भर पावसातही ऊस उत्पादक शेतकर्‍यां चा या दौर्‍यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

प्रतिकदादा पाटील म्हणाले,ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे एकरी उत्पादन दिवसेंदिवस कमी होत आहे,ही चिंतेची बाब आहे. पूर्वी प्रति हेक्टरी 105 टन ऊसाचे उत्पादन येत होते. आता ते 82 टनावर आले आहे. पूर्वी साखर कारखाना 160 दिवस चालत होता,आता तो 100 दिवसांवर आला आहे. आता आपणास कमी खर्चात ऊसाचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आपण लोकनेते राजारामबापू पाटील,माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांना सातत्याने प्रेम आणि साथ दिली आहे. आपल्यातील ऋणानुबंध अधिक दृढ करण्याचा माझा प्रयत्न आहे. आपल्याकडूनही साथ मिळावी.

देवराज पाटील म्हणाले, प्रतिकदादा पाटील यांच्यासह आम्ही आपल्या पेठ गटाचे प्रतिनिधित्व करीत आहोत. लोकनेते राजारामबापू पाटील यांची दूरदृष्टी, माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांचे अथक परिश्रमातून आपली शिवारात पाणी आले आणि आपल्या परिसराच्या विकासाला गती मिळाली आहे. यावेळी संचालक अतुल पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

या दौर्‍यात ऊस उत्पादक सभासदांनी पाणंद रस्ते,ऊस तोडी व यंत्रणा आदी विविध मुद्द्यांवर अनेक प्रश्न,समस्या मांडल्या. प्रतिक दादा पाटील यांनी हे प्रश्न समजून घेत ते सोडविण्याचे आश्वासन दिले.

jayant-patil-news-prateek-patils-member-contact-tour-to-increase-farmers-production

वाटेगाव संयुक्त पाणी पुरवठा संस्थेचे अध्यक्ष अशोक देवकर,राजारामबापू बँकेचे संचालक नामदेव मोहिते,सरपंच वसंत शिंदे, पै.दिनकर शिंदे,शंकरराव जाधव,डी.जी. खोत,राजारामबापू दूध संघाचे संचालक संजय शिंदे,वसंतराव कदम,रामचंद्र मोहिते, अरुण कदम,बबनराव यादव,राजाराम यादव, जयकर कदम,प्रा.प्रदीप पाटील,माजी सरपंच वसंतराव कांबळे,विनायक कदम,उपसरपंच संदीप कदम,सचिन खोत,नायकलवाडीचे सरपंच सुनिल कचरे,मधुकर कचरे,माणिक नायकल,संभाजी नायकल,संजय नायकल यांच्यासह त्या-त्या गावातील ऊस उत्पादक शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज