sangli news : अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाच्या बोजवारा : अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला बुधवारपासून सुरुवात झाली, मात्र पहिल्याच दिवशी वारंवार संकेतस्थळ ठप्प आणि सर्वर डाऊन होणे अशा तांत्रिक अडचणींचा सामना विद्यार्थी, पालकांना करावा लागला. दरम्यान गुरुवारपासून प्रवेश प्रक्रिया सुरळीत होण्याची शक्यत शिक्षण विभागाकडून व्यक्त करण्यात आली.
sangli news : अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाच्या बोजवारा
संकेतस्थळ चालेना, विद्यार्थी, पालक संतप्त
यंदा प्रथमच अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन अर्ज भरून होणार आहेत. त्यासाठी राज्यात एकच संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. आजपासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली. मात्र, पहिल्याच दिवशी संकेतस्थळ तांत्रिक कारणांमुळे कोलमडले. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्यात अडचणी येत होत्या. ऑनलाइन अर्ज करण्यास 28 तारखेपर्यंत मुदत आहे. प्रवेश प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी तांत्रिक अडचणी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
जिल्ह्यातीळ 242 उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये अकरावीसाठी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यासाठी आजपासून ऑनलाइन नोंदणी सुरू झाली. मात्र राज्यभरात एकाच पोर्टलवर नोंदणी सुरू असल्याने सर्वर डाऊन होणे, विद्यार्थ्यांना लॉगिन न होणे तांत्रिक अडचणी येत होत्या.
sangli-news-the-confusion-over-online-admission-for-class-11th
अकरावीसाठी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेसाठी 37 हजार 164 जागा आहेत. तर दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या 36 हजार 989 आहे. याशिवाय आयटीआय आणि डिप्लोमाच्या सुमारे अडीच हजार जागा आहेत. या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी ुुुसंकेतस्थळाची निर्मिती करून त्यावर ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. 28 मे पर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे गुरुवारपासून संकेतस्थळ नियमित सुरु राहिल, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











