वाळवा तालुक्यातील धनगर समाजातील पदाधिकार्यांचा पडळकरांना इशारा
jayant patil news : बेताल वक्तव्य बंद करा, अन्यथा जशास तसे उत्तर : राज्याचे माजी जलसंपदा मंत्री,जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आ.जयंतराव पाटील यांनी जत व आटपाडी तालुक्यातील पाण्या पासून वंचित गावांना पाणी देण्यासाठी टेंभू व म्हैसाळ योजनेतून 14 टीएमसी पाणीसाठा आरक्षित केला आहे. तसेच कृष्णा नदीतून वाहून जाणारे 2.5 टीएमसी पाणी उचलून दुष्काळी भागास दिले. आपले कर्तृत्व काय? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वाळवा तालुकाध्यक्ष विजयराव पाटील यांनी भाजपा आ.गोपीचंद पडळकर यांना केला. यावेळी वाळवा तालुक्यातील धनगर समाजातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आ. पडळकर यांच्या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध करीत आमच्या नेत्यावरील टीका- टिप्पणी बंद करा,आम्ही ती खपवून घेणार नाही,असा इशारा दिला.
jayant patil news : बेताल वक्तव्य बंद करा, अन्यथा जशास तसे उत्तर
भाजपाचे आ.गोपीचंद पडळकर यांनी काल (रविवारी) सांगली येथील सत्कार समारंभात बोलताना आ.जयंतराव पाटील यांनी जलसंपदा मंत्री म्हणून दुष्काळी भागासाठी काय केले? असा सवाल करीत टीका-टिप्पणी केली होती. त्यास वाळवा तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी उत्तर दिले.
माजी जि.प.सदस्य संभाजी कचरे, राजारामबापू साखर कारखान्याचे माजी संचालक माणिक शेळके,युवक राष्ट्रवादीचे आष्टा शहराध्यक्ष शिवाजी चोरमुले,वाळव्याचे पै.किसन गावडे,जेष्ठ उद्योगपती बाबुराव हुबाले,कृष्णेचे संचालक अविनाश खरात, राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक रमेश हाके,राजारामबापू सह.बँकेचे संचालक आनंदराव लकेसर,राजारामबापू सह.दूध संघाचे संचालक अनिल खरात प्रामुख्याने उपस्थित होते.
विजयराव पाटील पुढे म्हणाले,आ.पडळकर यांच्या पडळकरवाडी शेजारच्या टेंभु योजने च्या निंबवडे वितरिकेचे काम देखील आ. जयंतराव पाटील यांनी मार्गी लावले आहे. सध्याचे राज्य सरकार मॉडेल स्कुल हा उपक्रम राज्यात राबवित आहेत,त्याचे जनक आ.जयंतराव पाटील आहेत. स्मार्ट पीएचसी हा उपक्रम राज्यात आदर्शवत ठरला आहे.
आ.पाटील यांनी पालकमंत्री म्हणून त्या अडीच वर्षांच्या कालावधीत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील पुरग्रस्त गावांना यांत्रिक बोटी,सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका,विद्यार्थ्यांना शाळेतच मोफत दाखले,पोलिसांना चारचाकी व दुचाकी वितरण,प्रमुख शहरात सीसीटीव्ही कॅमेरे,जिल्हा पोलीस अधीक्षकांना सुसज्ज कार्यालय,सांगली शहरात मध्यवर्ती तपासणी केंद्र उभारणी,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक,कृष्णा नदीवर आयर्विन पुला ला पर्यायी पुल,कृष्णा घाटावर पुरसंरक्षक भिंत आदी असंख्य कामे मार्गी लावली आहेs .
संभाजी कचरे म्हणाले,आ.पडळकर हे जि.प.,विधानसभा व लोकसभा आदी 5 निवडणुकीत पराभूत झाले आहेत. यावेळी जत मतदारसंघातील जनतेने त्यांना संधी दिली आहे. त्यांनी जाती-जातीत तेढ निर्माण करणारी बेताल वक्तव्ये बंद करून सामान्य जनतेसाठी काम करावे. मी 2002 पासून जि.प.,पं.स.मध्ये काम करतोय. आ.जयंतराव पाटील यांनी पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील सर्व सदस्यांना कोणताही दुजाभाव न करता निधी दिला आहे. त्यांनी लोकांची दिशाभूल करू नये.
माणिक शेळके म्हणाले,सांगली येथील सत्कार कार्यक्रम हा बिगर राजकीय होता. या कार्यक्रमात राजकीय टीका करण्याची गरज नव्हती. त्यांनी आपल्या 1 तासाच्या भाषणात धनगर आरक्षणाबद्दल साधा ब्र शब्द काढला नाही. तसेच स्व.शिवाजीराव शेडगे (बापू) यांचा उल्लेख का टाळला? आ.पडळकर हे वाचाळवीर आहेत. मोठ्या नेत्यावर बेताल बोलण्याचे त्यांना व्यसन लागले आहे. या सभेत ते स्वतःला हुबलाक म्हणाले. राज्यात तुमची निर्विवाद सत्ता असतानाही आ.जयंत राव पाटील यांच्यावर टीका कशाला करता?
शिवाजी चोरमुले म्हणाले,स्व.आर.आर. आबांचा मुलगा आमदार झाल्यावर कोणाला काय वाटले? हे आम्ही बघतो. त्यात तुम्ही नाक खुसण्याची गरज काय? वाळवा तालुक्यात मोठ्या प्रमाणात धनगर समाज असताना आमच्या तालुक्यात तुमचा 10 बाय 10 साधा एक फ्लेक्स लागला का?
पै.किसन गावडे म्हणाले,बापू-दादांनी हा जिल्हा उभा केला आहे,हे वास्तव आहे. त्यांच्यावर बोलण्याची आपली पात्रता आहे का? ज्या माणसाने अरेवाडीच्या बिरोबाची खोटी शपथ घेतली,त्या माणसाकडून काय अपेक्षा करायच्या आहे? आले तालुक्यातील धनगर समाज स्व.बापूंच्या पासून आ. जयंतराव पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.
यावेळी प्रा.शामराव पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे इस्लामपूर शहराध्यक्ष शहाजी पाटील,जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील,माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील,नेर्ल्याचे सरपंच संजय पाटील,युवक तालुकाध्यक्ष संग्राम जाधव,कार्याध्यक्ष देवराज देशमुख,इस्लामपूर शहराध्यक्ष दिग्विजय पाटील,माजी अध्यक्ष सचिन कोळी उपस्थित होते.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



