दोघा सशयितांना जयसिंगपूर पोलिसांनी घेतले ताब्यात
jaysigpur murdar news : उदगावात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा भोकसून खून: सांगली कोल्हापूर रस्त्यावरील उदगाव (ता. शिरोळ) येथील खोत पेट्रोल पंपाजवळ हॉटेल समृद्धी येथे जुन्या रागातून तरुणाचा चाकूने भोकसून खून दोघाजणांनी खून केला. विपुल प्रमोद चौगुले (वय 21रा. उदगाव ता. शिरोळ) असे मयताचे नाव आहे. दोघा संशयितांना अवघ्या चार तासात ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
jaysigpur murdar news : उदगावात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा भोकसून खून
दरम्यान संशयित अनिकेत तानाजी मोरे (वय 22) व नागेश मारुती जाधव (वय 29, दोघेही रा. बेघर वसाहत, उदगाव ता. शिरोळ) या दोघांना ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, मयत विपुल चौगुले व संशयित आरोपी अनिकेत मोरे व नागेश जाधव हे तिघेही उदगाव गावचे रहिवासी आहेत. गतवर्षी झालेल्या मोहरम सणामध्ये एकमेकांच्याकडे बघितल्याच्या कारणातून वाद झाला होता.
चाकू सारख्या तीक्ष्ण हत्याराने विपुल याच्या पोटात वार करून गंभीर जखमी केले.
या वादाचा राग मनात धरून शनिवार मध्यरात्री सुमारास संशयित आरोपी अनिकेत मोरे आणि नागेश जाधव यांनी विपुल चौगुले यास उदगाव येथील खोत पेट्रोल पंप नाशिकच्या समृद्धी बारच्या आवारात लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत मोरे याने सोबत आणलेल्या चाकू सारख्या तीक्ष्ण हत्याराने विपुल याच्या पोटात वार करून गंभीर जखमी केले. त्या हल्ल्यात तो गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. या घटनेची माहिती मिळतात जयसिंगपूर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला.
सांगली येथील आकाशवाणी केंद्राजवळ या गुन्ह्यातील दोन संशयित असल्याची माहिती मिळाली होती
या गुन्ह्याबाबत पोलीस उपअधीक्षक रोहिणी साळुंखे व पोलीस उपनिरीक्षक सत्यवान हाके यांनी तातडीने पथकाची नियुक्ती करून तपास यंत्रणा कार्यरत केली. सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार तपास मोहीम गतिमान केली. सांगली येथील आकाशवाणी केंद्राजवळ या गुन्ह्यातील दोन संशयित असल्याची माहिती मिळाली होती या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश मांजरे, ताहीर मुल्ला, अभिजीत भातमारे यांच्यासह पोलीस पथकाने सापळा रचून संशयित मोरे व जाधव याला अवघ्या चार तासात शिताफीने ताब्यात घेतले.
या दोन्हीही संशयतांच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता विपुल चौगुले याचा खून केला असल्याची कबुली दिली. याबाबतची फिर्याद प्रमोद धनपाल चौगुले (वय 49 रा. उदगाव) यांनी पोलिसात दिली आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



