jaysingpur murdar news : उदगावात दारूची पार्टी सुरू असतानाच डोक्यात दगड घालून खून : मित्रांसमवेत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. लखन सुरेश घावट बागडी (रा. नांदणी रोड जयसिंगनगर जयसिंगपूर) असे त्याचे नाव आहे. उदगाव (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदीकाठी आज (रविवारी) दुपारी ही घटना घडली.
jaysingpur murdar news : उदगावात दारूची पार्टी सुरू असतानाच डोक्यात दगड घालून खून
दिवाळीपासून गेल्या पाच दिवसात शहरातील दुसर्या तरुणाचा खून झाल्याने घबराटीचे वातावरण आहे. संशयितांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची पथके विविध भागात रवाना करण्यात आली आहेत.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, लखन घावट- बागडी हा उदगाव येथील कृष्णा नदीकाठावर असलेल्या उदगाव पाणीपुरवठा जॅकवेलजवळ मित्रांसोबत जेवण तयार करून पार्टी करण्याकरीता गेले होता. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास लखनसोबत असलेल्या मित्रांच्यात वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
यावेळी झालेल्या झटापटीत लखन सुरेश घावट- बागडी याच्या डोक्यात मोठा दगड घालून जखमी केले. त्याला उपचारासाठी सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान लखन याचा मृत्यू झाला.
ऐन दिवाळीच्या लक्ष्मीपूजन दिवशी शहरातील तेराव्या गल्लीत रहावयास असलेल्या सुनील पाथरवट या युवकाचा खून झाला होता.
अवघ्या चार दिवसांपूर्वीची घटना ताजी असतानाच शहरातील नांदणी रस्त्यावरील जयसिंगनगर भागात राहणार्या लखन बागडी याच्या खुनाची घटना घडली. यामुळे शहरात घबराटीचे वातावरण आहे. व्यापार आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असणार्या जयसिंगपूर शहरात अलिकडच्या काळात वाढलेल्या गुन्हेगारीमुळे नागरिकांत असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत जयसिंगपूर पोलीस ठाण्यात सुरू होते.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











