iskampur news : ईश्वरपूरात डॉ.अण्णाभाऊ साठेंचा 9 फुटी पुतळा उभारणार

SHARE:

iskampur news : ईश्वरपूरात डॉ.अण्णाभाऊ साठेंचा 9 फुटी पुतळा उभारणार : उरूण-ईश्वरपूर नगरपरिषदेच्या समोरच्या आयर्लंड जागेत राजारामबापू सहकारी बँकेच्या माध्यमातून जगतविख्यात साहित्यिक, वाळवा तालुक्याचे सुपुत्र साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येत आहे. या पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांच्या हस्ते, डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या स्नुषा श्रीमती सावित्रीमाई साठे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि.29 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता होणार आहे. कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन राजारामबापू सह. बँकेचे माजी अध्यक्ष प्रा.शामराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.

iskampur news : ईश्वरपूरात डॉ.अण्णाभाऊ साठेंचा 9 फुटी पुतळा उभारणार

पुतळ्याच्या जागेचे भुमीपूजन 29 ऑक्टोबरला ः 1 ऑगस्टला अनावरण

राजारामबापू सहकारी बँकेचे अध्यक्ष विजयराव यादव, उपाध्यक्ष माणिकराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, माजी नगरसेवक खंडेराव जाधव, उत्तम चांदणे, शंकरराव महापुरे, डॉ.सुधाकर वायदंडे, विकास बल्लाळ, विजय लोंढे, संजय खवळे, सागर चव्हाण उपस्थित होते. प्रा.शामराव पाटील म्हणाले, आ.जयंतराव पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन बँकेच्या माध्यमातून पूर्णाकृती पुतळा उभा करू असा शब्द दिला होता.

त्याप्रमाणे आम्ही बँकेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीच्या भावमेतून नगरपरिषदेसमोरील आयर्लंड जागेत अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करीत आहोत. जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी उरूण-ईश्वरपूर यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. राज्यसरकारच्या नियम, अटींना अधीन राहून ठराव केला आहे. कागदपत्रांची पूर्तता केली आहे. नामवंत शिल्पकारास 9 फुटी पुतळ्याची ऑर्डर दिली आहे.

पुतळ्याच्या जागेवर 8 फुटी चबुतरा उभारला जाणार आहे. अण्णाभाऊ यांच्या जयंतीदिनी 1 ऑगस्ट 2026 रोजी पुतळ्याचे शानदार सोहळ्याने उद्घाटन केले जाणार आहे. या आंदोलनात स्वतःचे डोके फोडून घेतलेल्या जिगरबाज रामभाऊ देवकुळे, बापूराव बडेकर, भास्कर चव्हाण यांचा क्रांती योध्दा म्हणून सन्मान होणार आहे. समितीचे अध्यक्ष उत्तम चांदणे म्हणाले, माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी आंदोलनस्थळी अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्याचा दिलेला शब्द पूर्ण केला आहे.

समितीचे कार्यकर्ते व मातंग समाजाला मोठा आनंद होत आहे. प्रा.रमेश चव्हाण, संजय बल्लाळ यांनीही मनोगत व्यक्त केले. बाळासाहेब पाटील, संजय पाटील, सुभाष सुर्यवंशी, संदीप पाटील, अरुण कांबळे, शंकर चव्हाण, तानाजी साठे, कबीर चव्हाण, शशिकांत वायदंडे, सम्राट बाबर, हर्षद बल्लाळ, अमित पाटोळे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व जयंती महोत्सव समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *