tukaram munde news :गुटखा विक्रेत्यांवर आता मोका लागणार, तुकाराम मुंढे पुन्हा अॅक्शन मोडमध्ये : राज्यातील धडाडीचे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी जबाबदारी सांभाळताच, कारवाईचा धडाका सुरू केला आहे. गेल्या महिनाभरात तुकाराम मुंढेंनी एकापाठोपाठ एक कारवाया करत 3 कोटी 27 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 35 पेक्षा जास्त गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
tukaram munde news :गुटखा विक्रेत्यांवर आता मोका लागणार, तुकाराम मुंढे पुन्हा अॅक्शन मोडमध्ये
या कारवाईनंतरही राज्यातील काही ठिकाणी अवैध गुटखा, पानमसाला आणि तत्सम पदार्थांची विक्री होत असल्याने आता आयुक्त मुंढे आणखी अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. आता, उत्पादकापासून ते विक्री करणार्यापर्यंत सगळ्यांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे तुकाराम मुंढेंनी म्हटलं.
तुकाराम मुंढे यांनी चार्ज घेतल्यापासून अन्न व औषध विभागाने राज्यभरात अनेक ठिकाणी धाडी टाकून भेसळीचा माल जप्त केला आहे. संबंधित विक्रेत्यांना अटक करुन त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले आहेत. वर्तमानपत्रात -खाद्यपदार्थ विकणारे विक्रेते अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) रडारवर आले आहेत. खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात गुंडाळून विकू नका, अशी सक्त ताकीदही खाद्यविक्रेत्यांना देण्यात आली आहे.
आता, गुटखा, तंबाखू किंवा निकोटीनयुक्त पानमसाला तसेच तत्सम तंबाखू-मिश्रित प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण व विक्री करणार्या संघटित नेटवर्कविरुद्ध पात्र प्रकरणांत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, 1999 (मकोका) लागू करण्याबाबत सर्व क्षेत्रीय अधिकार्यांना तुकाराम मुंढेंनी निर्देश दिले आहेत.
उत्पादकापासून ते विक्री करणार्यापर्यंत सगळ्यांना हा नियम लागू असून मकोका कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जाईल. मकोका गुन्हा दाखल करण्यासाठी आरोपीचा इतिहास पाहून आवश्यक त्या गुन्ह्यानुसार कारवाई केली जाणार, असल्याचे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले.
गुटखा, तंबाखू किंवा निकोटीनयुक्त पानमसाला तसेच तत्सम तंबाखू मिश्रित प्रतिबंधित अन्नपदार्थाचे उत्पादन, साठवून, वाहतूक , वितरण आणि विक्री करणार्या संघटीत नेटवर्क विरोधात मकोका लागू करण्याचे आदेश तुकाराम मुंढेंकडून संबंधित विभागाच्या अधिकार्यांना देण्यात आले आहेत. ही संघटित गुन्हेगारी आहे, त्यामध्ये विक्री करणारा आणि विकत घेणारा देखील जबाबदार आहे, अशी माहिती तुकाराम मुंढेंनी पत्रकार परिषदेत दिली.
तसेच, यामध्ये आमचे काही अधिकारी देखील इनवॉल्ड आहेत, असे आरोप होत आहेत. मात्र, याची देखील चौकशी आम्ही करतोय, अधिकारी जर सहभागी असल्याचे आढळले तर तुम्हाला सांगण्यात येईल, त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असा सज्जड दमच मुंढेंनी दिला आहे.
3 कोटी 27 लाखांचा मुद्देमाल जप्त
तुकाराम मुंढेंनी पदभार स्वीकारल्यानंतर 25 मे ते 11 जून या कालावधीत प्रतिबंधक गुन्ह्यामध्ये 3 कोटी 27 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये, 35 जणांवर गुन्हे दाखल असून 350 जणांना अटक करण्यात आली आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










