kavtepiran news : कवठेपिरान येथे भरधाव कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू : मुलगी जखमी.

SHARE:

kavtepiran news : कवठेपिरान येथे भरधाव कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू : मुलगी जखमी. : मिरज तालुक्यातील कवठेपिरान येथील दत्त मंदिराजवळ भरधाव चारचाकीने दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला. सुमन गुंडा पाटील (वय 56, रा. कवठेपिरान) असे त्या महिलेचे नाव आहे. आज सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला.

kavtepiran news : कवठेपिरान येथे भरधाव कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू : मुलगी जखमी.

तसेच गावातील खणीजवळही त्या चारचाकीने एक मुलीस धडक दिली. त्यात शर्वरी जाधव ही जखमी झाली. ग्रामीण पोलिस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली आहे. याबाबत गौरव गुंडा पाटील यांनी फिर्याद दिली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गौरव पाटील हे कुटुंबासह मिरज तालुक्यातील कवठेपिरान गावात राहतात. सध्या त्यांच्या घराचे काम सुरू असल्याने ते दुसरीकडे राहण्यास आहेत. गौरव यांची आई सुमन या आज सकाळी सहाच्या सुमार जनावरांच्या गोठ्यात शेणघाण काढण्यासाठी चालत निघाल्या होत्या. त्यावेळी गावातील दत्त मंदिराजवळ पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या चारचाकी (एमएच 09 डीएक्स 1614) ने जोराची धडक दिली. त्यात सुमन या रस्त्याकडेला बेशुद्ध अवस्थेत पडल्या.

त्यानंतर गावातील लोकांच्या मदतीने त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, त्या चारचाकी चालकाने गावातील खणीजवळ आणखी एक अपघात करत मुलीला जखमी केला.

या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. पोलिस निरीक्षक अभिजीत देशमुख यांनी पाहणी केली. अज्ञात चारचाकी चालकाविरोधात गुन्हा नोंद केला. पोलिस अधिक तपास करत आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *