samdoli crime news : ऊस तोडणी मजूर पुरविण्याच्या आमिषाने समडोळीतील शेतकर्याची साडे आठ लाखाची फसवणूक : 2024-25 या गळीत हंगामासाठी 11 जोडपी ऊस तोडणी मजूर पुरविण्याचे आमिष दाखवून समडोळीतील शेतकर्याची 8 लाख 40 हजारांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. सदर फसवणुकीची घटना हि दि. 19 एप्रिल 2024 रोजी घडली.
samdoli crime news : ऊस तोडणी मजूर पुरविण्याच्या आमिषाने समडोळीतील शेतकर्याची साडे आठ लाखाची फसवणूक
या प्रकरणी भाऊसो लक्ष्मण देसाई (वय 61 रा. समडोळी) यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक करणार्या अंकुश मधुकर गेजगे (वय 35) आणि दिलीप मधुकर गेजगे (वय 25) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी भाऊसो देसाई हे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील समडोळी गावामध्ये राहतात. संशयित गेजगे बंधूंची देसाई यांच्याशी ओळख झाली होती. 2024-25 या उसाच्या गळीत हंगामासाठी ऊस तोडणी मजुरांची आवश्यकता देसाई यांना होती. संशयित गेजगे यांनी 11 ऊस तोडणी मजूर जोडपे पुरवतो असे सांगून दि. 19 एप्रिल 2024 पासून वेळोवेळी आरटीजीएस आणि रोख स्वरूपात 11 लाख 75 हजार रुपये नोटरी करण्यापूर्वी घेतले.
दि. 12 जून 2024 रोजी नोटरी आणि दस्त अन्वये करार केला. सदर व्यवहारापोटी देसाई यांनी 5 लाख 25 हजार रुपये दिले. त्यानंतर संशयित गेजगे यांनी देसाई यांच्याकडे काम करून 8 लाख 60 हजारांची परतफेड केली. त्यानंतर देसाई यांनी वेळोवेळी फोनवर आणि समक्ष जाऊन राहिलेल्या कामाबाबत चौकशी केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले.
आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच देसाई यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी 8 लाख 40 हजारांची फसवणूक केल्या प्रकरणी संशयित दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











