rajkiyalive

mahakumbh news : महाकुंभमध्ये महिलांचे स्नान करतानाचे व्हिडीओ विक्रीचे रॅकेट

mahakumbh news : महाकुंभमध्ये महिलांचे स्नान करतानाचे व्हिडीओ विक्रीचे रॅकेट  सांगली : प्रयागराजमधील एका यूट्यूबरने महाकुंभात महिलांचे स्नान करतानाचे व्हिडिओ बनवत यूट्यूब चॅनेलवर अपलोड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अहमदाबाद गुन्हे शाखेने शिराळा तालुक्यातील चिखली गावातील एका तरूणासा ताब्यात घेतले आहे. प्रांज राजेंद्र पाटील (20) असे त्या तरूणाचे नाव आहे.

mahakumbh news : महाकुंभमध्ये महिलांचे स्नान करतानाचे व्हिडीओ विक्रीचे रॅकेट

: शिराळा तालुक्यातील तरुण गुजरात पोलिसांच्या ताब्यात.

शिराळा पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेत अहमदाबाद पोलिसांच्या हवाली केल्याची माहिती निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांनी दिली. दरम्यान, अहमदाबाद पोलिसांनी एका यूट्यूबरसह तिघांना आतापर्यंत अटक केली आहे. तपासादरम्यान, महिलांचे आक्षेपार्ह फुटेज आढळून आले असून गुजरात व्हाया महाराष्ट्र कनेक्शन समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

mahakumbh-news-the-racket-of-selling-videos-of-women-bathing-in-mahakumbh

अहमदाबाद सायबर क्राइमच्या डीसीपी लविना सिन्हा यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या माहिती नुसार असे – संशयित तिघांनी महाकुंभात स्नान करणार्‍या महिलांचे व्हिडिओ इतर चॅनेलनाही विकले होते. ते चढ्या दराने व्हिडिओ विकण्याचा व्यवसाय चालवत होते, हे तपासात समोर आले आहे. देशातील 60-70 रुग्णालयांचे सीसीटीव्ही हॅक केल्याचाही संशय संशयितांवर आहे. संशयित आरोपींची ओळख पटली असून ते प्रयागराज येथील चंद्रप्रकाश फूलचंद, लातूर येथील प्रज्वल अशोक तेली आणि शिराळ्यातील प्रांज पाटील अशी आहे.

अहमदाबाद गुन्हे शाखेच्या तपासात असे दिसून आले की, हे तिघेही आरोपी महाकुंभात आंघोळ करणार्‍या महिलांचे व्हिडिओ यूट्यूब आणि टेलिग्राम चॅनेलवर विकत होते. त्या बदल्यात पैसे मिळवले. प्रयागराजमधील आरोपीच्या चॅनलवर महाकुंभमेळ्याचे व्हिडिओ आढळले त्यानंतर अहमदाबाद गुन्हे शाखेने महाराष्ट्रातून तेली आणि पाटील यांना अटक केली. दरम्यान, चंद्रप्रकाश फूलचंद यांना प्रयागराज येथून अटक करण्यात आली आहे.

mahakumbh-news-the-racket-of-selling-videos-of-women-bathing-in-mahakumbh

आरोपींची अजूनही चौकशी सुरू आहे. प्रयागराज येथून अटक करण्यात आलेल्या आरोपी चंद्रप्रकाश फूलचंदच्या चॅनलवर महाकुंभमेळ्याचे व्हिडिओ अपलोड करण्यात आले होते. आता त्याने हा व्हिडिओ स्वतः अपलोड केला आहे की कोणाकडून खरेदी केला आहे याची चौकशी केली जात आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज