sangli crime news : पत्नी सतत भांडते म्हणून केला कुर्हाडीने खून : शहरातील संजयनगर परिसरात असलेल्या शिंदे मळा येथील कुरणे गल्ली येथे कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा गळ्यावर आणि शरीरावर कुर्हाडीने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली. सदर खुनाची घटना हि आज शुक्रवार दि. 16 मे रोजी पहाटे पाऊणे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. अनिता सीताराम काटकर (वय 60 रा. कुरणे गल्ली, शिंदे मळा, सांगली) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
sangli crime news : पत्नी सतत भांडते म्हणून केला कुर्हाडीने खून
सदरचा खून करणारा संशयित पती सीताराम रामचंद्र काटकर (वय 65) याला संजयनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला आज न्यायालयापुढे उभे केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी कि, मृत अनिता काटकर या त्यांचे पती संशयित सीताराम काटकर यांच्यासोबत शिंदे मळा परिसरात असलेल्या कुरणे गल्ली मध्ये राहतात. दोघेही पती-पत्नी भाजी विक्रीचा व्यवसाय करत होते. काटकर पती पत्नी मध्ये गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरु होते. आज शुक्रवारी पहाटे पाऊणे सहा वाजण्याच्या सुमारास अनिता काटकर या त्यांच्या घरातील बेडरूम मध्ये झोपलेल्या होत्या.
यावेळी संशयित पती सीताराम काटकर याने कुर्हाडीने गळ्यावर, मानेवर आणि पाठीवर वार केले.
या हल्ल्यात अनिता काटकर यांचा जागीच मृत्यू झाला. खुनाच्या घटनेनंतर संशयित पती स्वतःहून संजयनगर पोलीस ठाण्यात हजर झाला. घटनेची माहिती मिळताच शहर विभागाच्या उपअधीक्षक विमला एम, पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांच्यासह पोलीस पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.
खुनाच्या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. दरम्यान, खून करणार्या संशयित पती सीताराम काटकर याला पोलिसांनी अटक केली असून कौटुंबिक वादातून निर्घृण पणे खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











