rajkiyalive

maruti mane news : मारुती मानेेंच्या स्मारकास 65 लाख मिळणार

maruti mane news : मारुती मानेेंच्या स्मारकास 65 लाख मिळणार : कवठेपिरान (ता. मिरज) येथील हिंदकेसरी मारुती माने यांचे स्मारकाच्या अपूर्ण कामाचा प्रस्ताव अधिकार्‍यांनी तातडीने पाठवा. या अपूर्ण कामासाठी लागणारा 65 लाख रुपयांचा निधीही तातडीने देण्यात येईल, असे आश्वासन क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

maruti mane news : मारुती मानेेंच्या स्मारकास 65 लाख मिळणार

दत्तात्रय भरणे ः अपूर्ण कामाचा प्रस्ताव देण्याच्या सूचना

मुंबईत हिंदकेसरी मारुती माने यांच्या स्मारकाबाबत क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी आमदार सदाभाऊ खोत, विठ्ठल पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भिमराव माने यांच्यासह क्रीडा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

भिमराव माने म्हणाले, मारुती माने यांच्या स्मारकासाठी मंजूर चार कोटी 90 लाख रुपये निधीपैकी क्रीडा विभागाकडे 59 लाख रुपये शिल्लक आहेत. तसेच राज्य क्रीडा विभागाकडे 80 लाख रुपये शिल्लक आहेत. त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडील शिल्लक 59 लाख रुपये निधीमधून सध्या हिंदकेसरी मारुती माने यांचा पुतळ्याचे काम होणार आहे. इमारतीमधील किरकोळ अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी 65 लाख रुपये निधीची गरज आहे.

आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू हिंदकेसरी पैलवान मारुती माने यांच्या कवठेपिरान येथील स्मारकाला दहा वर्षापूर्वी प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे. पण, निधीच्या अडथळ्यात गेल्या दहा वर्षापासून स्मारकाचे काम अपूर्णच आहे. याबद्दल क्रीडा मंत्री भरणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

maruti-mane-news-maruti-manes-memorial-will-get-65-lakhs

त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी अपूर्ण कामासाठी 65 लाख रुपये निधी मिळाल्यास तातडीने कामे पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन दिले. शिष्टमंडळ आणि अधिकार्‍यांची भूमिका जाणून घेतल्यानंतर क्रीडामंत्री भरणे यांनी क्रीडा विभागाच्या अधिकार्‍यांना तातडीने प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज