rajkiyalive

mukhyamantri ladki bahin : सांगली जिल्ह्याला लाडकी बहीणचा 134 कोटीचा पहिला हप्ता

जनप्रवास । सांगली

mukhyamantri ladki bahin : सांगली जिल्ह्याला लाडकी बहीणचा 134 कोटीचा पहिला हप्ता : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यात 4 लाख 45 हजार 647 अर्ज मंजूर झाले आहेत. जिल्ह्यासाठी लाडकी बहीणसाठी 134 कोटी रुपयांचा पहिला हप्ता मिळणार आहे. महिलांच्या बँक खात्यावर 17 ऑगष्ट रोजी 3 हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. बुधवारी दुपारपर्यंत नव्याने प्राप्त झालेल्या तब्बल 22 हजार अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे.

mukhyamantri ladki bahin : सांगली जिल्ह्याला लाडकी बहीणचा 134 कोटीचा पहिला हप्ता

4 लाख 45 हजार अर्जांना मंजुरी ः पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक सक्षम बनविण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. लाडकी बहिणसाठी जिल्ह्यात आतापर्यंत 4 लाख 59 हजार 792 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 4 लाख 23 हहजार 440 अर्जांना यापूर्वीच मंजुरी दिली आहे. 14 ऑगष्ट रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत प्रशासनाकडे आलेल्या 22 हजार 72 अर्जांनाही मंजुरी देण्यात आली.

आतापर्यंत 4 लाख 45 हजार 647 अर्जांना मंजुरी मिळाली असून हे प्रमाण 97 टक्के इतके आहे. 1 हजार 483 महिलांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. अंशतः कारणाने हे अर्ज अपात्र करण्यात आले आहेत. मात्र आवश्यक कागदपत्रे व त्रुटींची पुर्तता करण्याचे आदेश दिले आहेत.

योजनेतून महिन्याला दीड हजार रुपये दिले जातील. जुलै आणि ऑगष्ट या दोन महिन्यांचे मिळून 3 हजार रुपये 17 ऑगष्ट रोजी बँक जमा करण्याची कार्यवाही केली जात आहे. रक्षाबंधनदिवशी लाडक्या बहिणींना आपल्या खात्यात 3 हजार रुपये जमा होतील. पहिल्या हप्त्यापोटी जिल्ह्याला 134 कोटी मिळतील. 17 ऑगष्ट रोजी पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उममुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत लाडकी बहीण योजनेतील पैसे जमा करण्याचा राज्यस्तरीय कार्यक्रम तर मिरजेत जिल्हास्तरीय कार्यक्रम होणार असल्याचे पालकमंत्री डॉ. खाडे यांनी सांगितले.

यावेळी खासदार विशाल पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, अप्पर जिल्हाधिकारी स्वाती देशमुख, महिला बाल कल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदिप यादव उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज