samdoli news : शांतीसागर को. ऑप के्रडीट सोसायटी समडोळीच्या चेअरमनपदी राजवर्धन पाटील : मिरज तालुक्यातील समडोळी येथील शांतीसागर को. ऑप. के्रडीट सोसायटीच्या चेअरमनपदी उद्योजक राजवर्धन पाटील यांनी एकमताने निवड करण्यात आली. संस्थेचे संस्थापक चेअरमन सुरेश पाटील यांनी राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती. या जागेवर सर्वानुमते राजवर्धन पाटील यांची निवड करण्यात आली.
samdoli news : शांतीसागर को. ऑप के्रडीट सोसायटी समडोळीच्या चेअरमनपदी राजवर्धन पाटील
निवडीनंतर चेअरमन राजवर्धन पाटील म्हणाले, शांतीसागर को ऑप के्रडीट सोसायटीची स्थापना 2005 रोजी झाली आहे. सध्या संस्थेचे भागभांडवल 2 कोटी 10 लाख रूपये असून, निधी 7 कोटी 40 लाख आहे. संस्थेकडे 72 कोटीच्या ठेवी आहेत तर 60 कोटीची कर्ज वाटप करण्यात आले आहे. संस्थेची 23 कोटी 58 लाख गुंतवणूक आहे. तसेच 98 टक्के कर्जवसुली आहे. संस्थेला गेल्या आर्थिक वर्षात 2 कोटी 40 लाखाचा नफा झाला आहे. तर एकूण व्यवसाय 132 कोटीचा झाला आहे.
ते पुढे म्हणाले, संस्थेचे सांगली जिल्हा कार्यक्षेत्र असून, एकूण संस्थेच्या समडोळी, वखारभाग सांगली, नेमीनाथनगर सांगली, तुंग, पार्श्वनाथनगर सांगली अशा पाच शाखा आहेत. संस्थेला बँको, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन यांच्यामार्फत विशेष पुरस्कार प्राप्त झाल्या आहेत. समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करणार्या जीवन मंगल चॅरिटेबल ट्रस्टला प्रतिवर्षी 25 हजार देणगी देण्यात येते. तसेच सामाजिक बांधिलकी जपत गरीब होतकरू मुलांना शालेय साहित्य व गणवेश वाटप, रक्तदान शिबीर, समाज प्रबोधनपर व्याख्यानमाला तसेच वृक्षारोपण असे उपक्रम राबविण्यात येतात.
samdoli-news-rajvardhan-patil-appointed-as-chairman-of-shantisagar-co-op-credit-society-samdoli
यावेळी संस्थापक सुरेश पाटील, व्हा. चेअरमन पायगोंडा पाटील, संचालक एस. के. पाटील, विजय बालाप, जितेंद्र ढंग, नेमिनाथ केसुरे, राजू तलाठी, बाळासो जाधव, विद्याधर बेले, अजित पाटील, तानाजी सौंदडे, पोपट पाटील, चंदू यमाण्णा, राजाराम हजारे, मॅनेंजर पवन पाटील, महिला संचालक आदी उपस्थित होते. निवडीनंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.