rajkiyalive

sangli bjp news : सांगली विधानसभा मतदार संघात भाजपच्या मतांचा आलेख चढताच…

sangli bjp news : सांगली विधानसभा मतदार संघात भाजपच्या मतांचा आलेख चढताच…गेल्या सलग तीन निवडणुकीत भाजपने सांगली विधानसभा निवडणुकीत बाजी मारली आहे. 2009 मध्ये संभाजी पवार, 2014 आणि 2019 मध्ये सुधीर गाडगीळ यांनी भाजपचा झेंडा फडकावला. 2004 मध्येही संभाजी पवार भाजपच्या चिन्हावर उभे होते. परंतु त्यांचा पराभव झाला. परंतु गेल्या चार निवडणुकीतील आकडेवारी पाहिली असता भाजपचा मतात वाढच होत आहे. त्यांच्या मताची टक्केवारी वाढतच चालली आहे.

sangli bjp news : सांगली विधानसभा मतदार संघात भाजपच्या मतांचा आलेख चढताच…

सांगली विधानसभा मतदार संघ हा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला. परंतु हा बालेकिल्ला ढासळला तो 1986 मध्ये दादांच्या हयातीतच दादांचे पुतणे विष्णुअण्णा पाटील यांचा सांगलीमध्ये संभाजी पवारांनी पराभव केला. तेंव्हा पासून काँग्रेस येथे विजयासाठी झगडत आहे. 2004 मध्ये मदन पाटील निवडून आले पण ते अपक्ष म्हणून निवडून आले होते.

सांगली विधानसभा मतदार संघात या अगोदरही भाजप रिंगणात असायची. नीता केळकर यांनीही ही भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली परंतु भाजपला सोन्याचे दिवस आले ते संभाजी पवार यांच्या रूपाने. संभाजी पवार यांनी नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपच्या चिन्हावर पहिल्यांदा ते उभे राहिले ते 2004 मध्ये या निवडणुकीत त्यांचा जरी पराभव झाला असला तरी त्यांना 39 हजार 786 मते मिळाली होती.

2009 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा संभाजी पवार भाजपच्या चिन्हावर उभे राहिले. यावेळी काँग्रेसतर्फे मदन पाटील उभे होते. यावेळी संभाजी पवारांना 77404 मते मिळाली आणि ते निवडून आले. मदन पाटील यांना 66240 मध्ये मिळाली.

2014 च्या निवडणुकीत भाजपने सुधीर गाडगीळ यांच्या रूपाने नवीन चेहरा दिला. यावेळी तिरंगी लढत होवूनही गाडगीळ यांना 80497 मते मिळाली. तर काँग्रेसच्या मदन पाटील यांना 66040 तर शिवसेनेच्या चिन्हावर राहिलेल्या पृथ्वीराज पवार यांना 34635 मते मिळाली.
गेल्या म्हणजेच 2019 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपच्या सुधीर गाडगीळ यांना 93636 मते मिळाली तर काँग्रेसच्या पृथ्वीराज पाटील यांना 86697 मध्ये मिळाली.

त्यामुळे निवडणूक दुरंगी असो वा तिरंगी गेल्या चार निवडणुकीत भाजपच्या मतात वाढच होताना दिसत आहे. 39786, 77404, 80497, 93636 असे मतदानात वाढ होताना दिसत आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज