sangli crime news : सांगलीतील आदित्य हॉस्पिटलमध्ये वंचितचा राडा : शासकीय आणि कामगार योजनेतील लाभार्थ्यांकडून शस्त्रक्रियेसाठी अतिरिक्त रक्कम घेत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विश्रामबाग चौकातील आदित्य मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलची तुफान तोडफोड केली यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी काठ्यांनी हॉस्पिटलच्या काचांसह इतर साहित्याचे अंदाजे पाच ते सहा लाखांचे नुकसान केले. दुपारी पाऊणे एक वाजण्याच्या सुमारास सदरची घटना घडली. दरम्यान, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी डॉ. सुनील लक्ष्मण माने यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून 17 आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
sangli crime news : सांगलीतील आदित्य हॉस्पिटलमध्ये वंचितचा राडा
कर्मचार्यांना मारहाण, हॉस्पिटलची तोडफोड करत 6 लाखांचे नुकसान : पोलिसांनी 17 जणांना ताब्यात घेत गुन्हे केले दाखल.
शंकर मार्तंड माने (रा. कवठेमहांकाळ), विद्धनाथ मार्तंड माने (रा. कवठेमहांकाळ), सुरज वसंत काळे (रा.बोरगाव), आकाश शिवाजी लोंढे (रा. कवठेमहांकाळ), बिरुदेव महादेव करडे (रा. वाल्मिक आवास, सांगली), संतोष कुमार वनखडे (रा. कवठेमहांकाळ), संजय यल्लाप्पा सनदी (रा. बोरगाव), पारगोंडा रायगोंडा पाटील (रा. अनंतपूर, अथणी), विशाल मनोहर कांबळे (रा. मिरज), सविता शंकर माने (रा. कवठेमनकाल), रेशमा संतोष वनखडे (रा.कवठेमहणकाळ), शबाना मशाद पटेल (रा. शिरढोण), उज्वला राजाराम धोत्रे (रा. अंजनी), राखी प्रदीप शिंदे (रा. कवठेमहांकाळ), संजना भानुदास आठवले (रा. इरळी), दीपाली राजू सोनवणे रा. मळणगाव) आणि छाया खंडू कांबळे (रा. कोकळे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
विश्रामबाग चौक येथे डॉ. शरद सावंत यांचे आदित्य मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे.
या हॉस्पिटल मध्ये विविध योजनेतून शस्त्रक्रिया करण्यात येतात. जिल्ह्यातील काही गावामधून याठिकाणी रुग्ण शस्त्रक्रियेसाठी दाखल झाले होते. याठिकाणी सदरचे उपचार योजनेत बसत नाहीत असे म्हणून अतिरिक्त शुल्क त्यांच्याकडून आकारण्यात आल्याचा दावा रुग्णांच्या नातेवाईकांनी केला. तसेच कामगार योजेतून उपचार करण्यासाठी नकार दिल्याच्या तक्रारी वंचित बहुजन आघाडीकडे आल्या होत्या. यानंतर आज (मंगळवारी) दुपारी पाऊणे एक वाजण्याच्या सुमारास वंचित आघाडीचे कार्यकर्ते हातात झेंडे घेऊन घोषणाबाजी करत हॉस्पिटल मध्ये घुसले.
यावेळी संतप्त झालेल्या काही कार्यकर्त्यांनी हातात असणार्या काठ्यांनी हॉस्पिटलच्या काचांची तोडफोड केली.
यावेळी खिडक्यांच्या काचा, मेडिकलच्या काचा तसेच हॉस्पिटल मधील इतर साहित्यांची तोडफोड करून पाच ते सहा लाखांचे नुकसान केले. त्याचबरोबर रुग्णालयातील कर्मचार्यांवर हल्ला करत मारहाण केली. या घटनेची माहिती मिळतात विश्रामबाग पोलीस घटनास्थळी दाखल होत सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले. दरम्यान, या प्रकरणी रुग्णालयातील डॉ. सुनील माने यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आंदोलन करून तोडफोड करणार्या 17 जणांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेनंतर तणावाचे वातावरण होते.
दरम्यान, रुग्णालय आणि आंदोलकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले आहेत.
सदरची तोडफोड हि निषेधार्ह असून केवळ खंडणी मागण्यासाठी हा प्रकार केल्याचा गंभीर आरोप डॉ. शरद सावंत यांनी केला आहे. आमच्या रुग्णालयात योजनेतूनच उपचार केले जात असल्याचे सांगून त्यांनी सर्व आरोप फेटाळले आणि जिल्हा पोलीस प्रमुखांनी तोडफोड करणार्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. दुसरीकडे सामान्य नागरिकांना योजना नाकारणार्या तसेच त्यांच्याकडून ज्यादा पैसे घेणार्यांवर कारवाई करून सदरचे रुग्णालय बंद करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.