rajkiyalive

sangli crime news : घानवड येथील माजी उपसरपंचाचा खून अनैतिक संबंधातूनच : संशयित दोघांच्या एलसीबीने आवळल्या मुसक्या.

 sangli crime news : घानवड येथील माजी उपसरपंचाचा खून अनैतिक संबंधातूनच : संशयित दोघांच्या एलसीबीने आवळल्या मुसक्या. : सांगली : खानापूर तालुक्यातील घनवड गावचे माजी सरपंच आणि सराफ व्यावसायिक बापूराव देवप्पा चव्हाण यांचा खून हा अनैतिक संबंधातून झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने मुख्य दोघा संशयितांच्या सिद्धेवाडी येथून मुसक्या आवळल्या आहेत. विशाल बाळासो मदने (वय 23) आणि सचिन शिवाजी थोरात (वय 25 दोघे रा. घनवड ता. खानापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

sangli crime news : घानवड येथील माजी उपसरपंचाचा खून अनैतिक संबंधातूनच : संशयित दोघांच्या एलसीबीने आवळल्या मुसक्या.

याबाबत अधिक माहिती अशी कि, बापूराव देवाप्पा चव्हाण हे घानवड गावचे माजी उपसरपंच होते तसेच त्यांचे विटा येथे सोनारसिद्ध ज्वेलर्स या नावाने ज्वेलरीचे दुकान आहे. गुरुवारी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास ते आपल्या बुलेट गाडीवरून नेवरी रस्त्यावरील पोल्ट्री शेडकडे निघाले होते. यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी गार्डी गावालगत असलेल्या या रस्त्यावर अडवून त्यांचा निर्घृण पणे गळा चिरून खून केला. खुनानंतर बापूराव चव्हाण हे रस्त्याकडेला रक्ताच्या थारोळ्यात पडताच हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले.

ही घटना रस्त्यावरून येणार्‍यांनी पाहिली असता याबाबतची माहिती विटा पोलिसांना देण्यात आली. तात्काळ याठिकाणी विभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्यासह पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांना माहिती मिळाली कि, सदर गुन्ह्यातील मुख्य संशयित आणि त्याचा साथीदार हे दोघे मिरज ते पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या सिद्देवाडी फ्लाय ओव्हरच्या खाली येणार आहेत. मिळालेल्या माहिती नुसार त्याठिकाणी सापळा लावला असता संशयित मदने आणि थोरात हे त्याठिकाणी आले.

यावेळी त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी अनैतिक संबंधाच्या कारणातून सदरचा खून केल्याची कबुली दिली. यावेळी त्यांना ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करण्यात आली. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, संजय फडतरे, सहाय्यक निरीक्षक सिकंदर वर्धन, कर्मचारी संजय पाटील, सूर्यकांत साळुंखे, हणमंत लोहार, प्रमोद साखरपे यांच्या पथकाने केली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज