पलूस आगारातील घटना
पलूस प्रतिनिधी – sangli crime news : तपासणी अधिकार्याच्या जाचाला कंटाळून एस. टी. वाहकाची आत्महत्त्या : पलूस एसटी आगारातील एसटी वाहकाने तपासणी अधिकार्याच्या जाचाला कटांळून एसटी वाहकाने आत्महत्त्या केल्याच्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. दुशांत गंगाराम बुळे ता.जुन्नर असे कंडक्टर यांचे नाव आहे.
sangli crime news : तपासणी अधिकार्याच्या जाचाला कंटाळून एस. टी. वाहकाची आत्महत्त्या
पलूस एसटी आगारात वाहक म्हणून कार्यरत असणार्या दुशांत गगाराम बुळे याने शनिवारी तासगांव येथे तपासणी अधिकारी यांनी केलेल्या कार्यवाहीच्या तणावातून हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे त्याने स्टेटसच्या व्हिडिओवरून समोर आले आहे. त्याचा मृतदेह पलूस येथील शासकीय रूग्णालयात नेण्यात आला असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी प्रक्रिया सुरु आहे. तर आदिवासी कर्मचार्यांवर जाणीव पूर्वक अन्याय करून आत्महत्येस प्रवृत्त करणार्या अधिकार्यांवर गुन्हा दाखल करा, त्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईक व समाज बांधवांनी घेतली आहे.
याप्रकरणी मिळालेल्या माहिती नुसार, पलूस बस आगाराचे वाहक दुशांत गगाराम बुळे हे शनिवारी सकाळी कराड जत या बसमध्ये ड्युटी करीत होते. बस तासगांव तालुक्यात गेल्यावर तपासणी अधिकारी यांनी बसची तपासणी केली. यावेळी त्याच्याकडे काही रक्कम कमी आढळल्याचे समजते.
सकाळी दहाच्या दरम्यान तासगांव डेपो येथे संबंधित अधिकारी आणि वाहक यांच्या मध्ये वादवादी झाली. यावेळी केलेला व्हिडिओ त्याने वॉटस अॅप स्टेटस वर ठेवला आहे. त्याच्यावर खोटी केस दाखल केल्याचा अंदाज यावरून व्यक्त होत आहे.
याचा राग मनात धरून वाहक दुशांत बुळे यांनी आपली ड्युटी पुर्ण न करता शिरढोणमध्ये उतरले. तेथून पलूस एसटी डेपो मध्ये परतले. याठिकाणी सर्व हिशोब देऊन एकच्या सुमारास ते घरी गेले. जाताना आपल्या लॉकर मधील साहित्य घेऊन त्यानंतर कोयना वसाहत, पलूस येथील घरी गेले. झाल्या प्रकारामुळे आपल्यावर अन्याय झाल्याच्या भावनेतून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले आणि आपली जिवनयात्रा संपवली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.