rajkiyalive

sangli news : ‘शक्तिपीठ’मुळे सांगली जिल्ह्यातील 900 एकर द्राक्ष बागेवर फिरणार रोलर

फेबु्रवारीच्या पहिल्या आठवड्यात भूसंपादनाच्या हालचाली

sangli news : ‘शक्तिपीठ’मुळे सांगली जिल्ह्यातील 900 एकर द्राक्ष बागेवर फिरणार रोलर : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यातून जाणार आहे. त्याचा सर्वाधिक फटका हा द्राक्ष बागांना बसणार आहे. सुमारे नऊशे एकर द्राक्ष बागांची जमिन सरकारला संपादन करावी लागणार आहे. यामध्ये तासगाव तालुक्यातील सर्वाधिक क्षेत्र असणार आहे. प्रशासनाकडून याच्या हालचाली फेबु्रवारीमध्ये सुरू होण्याची शक्यता दाट आहे. द्राक्ष पिक गेल्यानंतर बागांवर रोलर फिरविण्याचा घाट सरकारचा असणार आहे.

sangli news : ‘शक्तिपीठ’मुळे सांगली जिल्ह्यातील 900 एकर द्राक्ष बागेवर फिरणार रोलर

राज्यातील समृध्दी महामार्गाच्या धर्तीवर महायुती सरकारने नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाची घोषणा सप्टेंबर 2022 मध्ये करण्यात आली. राज्यातील 12 जिल्ह्यांमधून 802 किमी लांबीचा हा महामार्ग असून सुमारे 27 हजार हेक्टर जमिन अधिग्रहित करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकार 86 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. या संपूर्ण महामार्ग सहा पदरी होणार आहे.

राज्यातील वर्धा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांतून हा महामार्ग जाणार आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून शेतकर्‍यांचा विरोध झाल्यानंतर विधानसभेला या प्रकल्पाला स्थगिती दिली होती. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता काम सुरू केले आहे. पण यातून कोल्हापूर वगळले आहे.

महामार्गासाठी जिल्ह्यातील सुमारे दीड हजार एकर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे.

या भूसंपादनाचा डाटा प्रातांधिकार्‍यांमार्फत तयार करण्यात आला आहे. तो डाटा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) सादर केला जाणार आहे. यापूर्वी मार्किंग करण्यात आलेले आहे. एमएसआरडीसीची मान्यता मिळाल्यानंतर लेआऊट केले जाणार आहे.

सांगली जिल्ह्यातील खानापूर (जि. सांगली) तालुक्यातील बाणूरगडमध्ये महामार्गाचा प्रवेश होईल. तेथून कवठेमहांकाळ तालुक्यात तिसंगी, तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी, सावळज, अंजनी, वज्रचौंडे, मणेराजुरी, मतकुणकीतून, मिरज तालुक्यातील कवलापूर, बुधगाव, कर्नाळ, पद्माळे, सांगलीवाडी अशा गावांमधून तो जाणार आहे.

महामार्ग जात असलेल्या गावांमध्ये सुमारे 900 एकर द्राक्ष पिके आहेत. तर उर्वरित ठिकाणी ऊस व इतर पिके घेतली जात आहेत. खानापूर तालुका वगळता इतर तालुक्यातील जमिनी या पिकाऊ आहेत. महामार्गामुळे या पिकाऊ जमिनीवर शासन रोलर फिरविणार आहे. सांगली जिल्हा द्राक्ष शेतीमध्ये अग्रेसर आहे. त्यामध्ये तासगाव तालुक्यातील अनेक गावातील द्राक्षे परदेशात जातात. मात्र या महामार्गामुळे द्राक्ष शेतीला मोठा फटका बसणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी या महामार्गाला विरोध केला.

सत्ताधारी मंत्री, खासदार व आमदार देखील या महामार्गाच्या विरोधात आहेत. त्यामुळे कोल्हापुरातील भूसंपादन थांबले आहे. मात्र सांगली जिल्ह्यातील भूसंपादन होणार आहे. त्यासाठी अंतिम नोटीसा लवकरच येण्याची शक्यता आहे.

भूसंपदाचा मोबदला देखील अल्प..
जिल्ह्यातील तासगाव व मिरज तालुक्यातील द्राक्षे, ऊस शेतजमिनीचे बाजारभाव एकरी पन्नास लाख ते एक कोटींच्या आसपास आहेत. मात्र याचा रेडिरेकनरचा दर केवळ 10 ते 13 लाख रुपये आहे. शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन गेल्यास भरपाई तुटपुंजी मिळणार असल्याने अनेक शेतकर्‍यांचा महामार्गाला विरोध आहे. चालू बाजारभाव गृहित धरून त्याच्या चारपट भरपाई मिळायला हवी, अशी दुष्काळी टापूतील शेतकर्‍यांच्या भावना आहेत. पण पिकाऊ जमिनी तासगाव व मिरज तालुक्यातील शेतकरी देणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज