वाढीव कोट्याचा प्रस्ताव प्रलंबीत ः लाभार्थी धान्याच्या प्रतिक्षेत ः लोकप्रतिनिधींकडून पाठपुराव्याची गरज
sangli news : अत्योंदयचे 60 हजारांवर लाभार्थी धान्यापासून वंचीत : शासनाकडून वाढीव धान्याचा कोटा (इष्टांक) मंजूर न झाल्यामुळे अंत्योदयची पाचशे कुटुंबे आणि 60 हजार लाभार्थी रेशनवरील धान्यापासून वंचित आहेत. धान्य वितरण कार्यालयात हेलपाटे मारुनही धान्य मिळत नसल्याने लाभार्थी हवालदील झाले आहेत. वाढीव कोटा मंजूर नाही. त्यामुळे चौकशी करु नये असे पत्रच अनेक धान्य वितरण कार्यालयामध्ये लावण्यात आले आहे.
sangli news : अत्योंदयचे 60 हजारांवर लाभार्थी धान्यापासून वंचीत
दरम्यान राज्य शासनाने नवीन शिधापत्रिका धारकांना मोफत धान्य मिळण्यासाठी इष्टांक (धान्याचा कोटा) वाढविण्याची आवश्यकता आहे. अन्यथा शासनाला लाभार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
सांगली जिल्ह्यातील सुमारे सच्या चार लाख कुटुंबे मोफत घान्यासाठी इष्टांक ठरलेले आहेत. त्यानंतर सप्टेंबर 2023 पासून वाढ झालेले शिधापत्रिकाधारक सदस्यांना वाढीव धान्याचा कोटा आला नाही. परिणामी या शिधापत्रिकाधारकांना धान्यापासून वंचित राहावे लागत आहे, तर त्यांना केवळ पुराव्यासाठीच शिधापत्रिका वापरावी लागत आहे. शिधापत्रिकाधारकांना रास्त भाव दुकानातून मोफत धान्य देण्यात येते. त्याचा कोटा हा शासनाकडून निश्चित करण्यात येतो. त्याला इष्टांक म्हणतात. इष्टांक जास्त नसल्याने नवीन शिधापत्रिकाधारकांना अन्नसुरक्षा योजनेतून दिले जाणारे मोफत धान्य मिळत नाही. यामुळे अन्नसुरक्षा योजनेतून धान्य मोफत मिळण्यासाठी इष्टांक वाढविण्याची मागणी होत आहे.
सप्टेंबर 2023 पासून यामध्ये अंत्योदयच्या पाचशे कुटुंबांची आणि इतर शिधापत्रिकांमध्ये 60 हजार सदस्यांची भर पडली आहे. या नव्या सदस्यांना आणि अंत्योदयच्या शिधापत्रिका धारकांना दीड वर्षांपासून धान्यच मंजूर करण्यात आलेले नाही, परिणामी त्यांना मोफत धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. सांगली जिल्ह्यामध्ये सध्या 4 लाख 23 हजार 294 शिधापत्रिका धारकांना रेशनवरील मोफत धान्याचा लाभ देण्यात येत आहे.
sangli-news-over-60-thousand-beneficiaries-of-atyondaya-deprived-of-food-grains
यामध्ये अंत्योदय रेशनकार्ड धारकांची संख्या 30 हजार 601 मात्र इष्टांक नसल्यामुळे अन्नसुरक्षा योजनेतून सर्वसामान्य नागरिक वंचित राहत आहेत. त्यामुळे इष्टांक वाढविण्याची आवश्यकता आहे. इष्टांक वाढविल्यास गरजू नागरिक योजनेपासून वंचित राहणार नाहीत. पण पाठपुराव्याच्या अभावी लाभार्थी गेल्या दीड -दोन वर्षापासून धान्याच्या प्रतिक्षेत आहेत.
तालुकानिहाय शिधापत्रिकाधारक
सांगली : 1,04,058, मिरज: 88,625, आटपाडी: 31,490, जत: 67,936, कडेगाव : 31,804, खानापूर : 39,915, कवठेमहांकाळ : 31,496, पलूस : 33,716, शिराळा : 32, 267, तासगाव : 52,907, वाळवा : 86,110 एकूण : 6,00,324सव्वाचार लाख कुटुंबांना मोफत धान्य
जिल्ह्यात अंत्योदय रेशनकार्ड धारकांची संख्या 30 हजार 601 आहे. या कार्डधारकांना महिन्याला 15 किलो गहू आणि 20 किलो तांदूळ मोफत देण्यात येतो, त्याचबरोबर जिल्ह्यात 3 लाख 92 हजार 693 प्राधान्य कुटुंब योजना कार्डधारक आहेत. यातील कार्डधारकांना माणसी 2 किलो गहू, तर 3 किलो तांदूळ मोफत देण्यात येतो. एकूण 4 लाख 23 हजार 294 शिधापत्रिका धारकांना रेशनवरील धान्याचा लाभ देण्यात येतो.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.