जनप्रवास । सांगली
sangli-vidhansabha-bjp-news-chandrakantada-again-sangli-for-patchup-of-bjp : सांगली विधानसभेसाठी भाजपकडून आ. सुधीर गाडगीळ यांना पक्षाने पुन्हा तिसर्यांदा उमेदवारी जाहीर केल्याने भाजपमध्ये नाराजी उफाळली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी डोंगरे यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भाजपचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार नाराज झाले असून नॉट रिचेबल झाले आहेत. भाजपने सांगलीत हॅटट्रिक मारण्याचा चंग बांधला असून पक्षाचे जेष्ठ नेते व उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील नाराजांची मनधरणी करणार आहेत. मंत्री पाटील हे शुक्रवारी सांगलीत येत असून डोंगरे, इनामदार यांच्यासह पृथ्वीराज पवार, माजी आ. दिनकर पाटील यांच्याशीही चर्चा करणार आहेत.
sangli vidhansabha bjp news : भाजपच्या पॅचअपसाठी चंद्रकांतदादा पुन्हा सांगलीत
आमदार सुधीर गाडगीळ यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यांच्या निर्णयाला कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला होता. निर्णय मागे घेण्याची विनंती केली होती. आ. गाडगीळ यांनी यावर फेरविचार करू, असे देखील स्पष्ट केले होते. या काळात भाजपकडून युवा नेते पृथ्वीराज पवार, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार, माजी आमदार नितीन शिंदे, नीता केळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी डोंगरे, स्वाती शिंदे आदी इच्छुकांनी विधानसभा मतदारसंघात पेरणी सुरू करत उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले होते. रविवारी भाजपने 99 उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये पुन्हा आ. सुधीर गाडगीळ यांना उमेदवारी देण्यात आल्याने पक्षांतर्गत नाराजी पसरली आहे.
शिवाजी डोंगरे यांनी सोमवारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेवून विधानसभेच्या निवडणुकीत बंडखोरी करणार असल्याचे जाहीर केले.
शेखर इनामदार देखील पक्षावर नाराज झाले आहेत. आ. गाडगीळ यांची इच्छा नसल्याने पक्षाच्या काही नेत्यांनी त्यांना तयारी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांनी तशी तयारी देखील केली होती. तिकीट न मिळाल्याने इनामदार नाराज आहेत. इनामदार यांचा सोमवारपासून दूरध्वनी बंद आहे. गाडगीळांच्या उमेदवारीमुळे पक्षांतील नेत्यांत नाराजी उफाळली आहे.
भाजपच्या वरिष्ट नेत्यांनी उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा यांना सांगलीत जावून नाराजांची मनधरणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पाटील हे सांगलीत येणार असून डोंगरे, इनामदार यांच्याशी चर्चा करणार आहेत. याशिवाय भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार हेही नाराज झाले आहेत. माजी आ. दिनकर पाटील यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली होती. त्यांनाही डावलण्यात आले, त्यामुळे पक्षांतील नेत्यांत वाढलेली नाराजीने दूर करण्यासाठी ना. चंद्रकांतदादा पदाधिकार्यांच्या भेटी घेवून नाराजी दूर करणार आहेत.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



