sangli vidhansabha bjp news : शिवाजी मंडई हायटेक करणार सुधीर गाडगीळ : छत्रपती शिवाजी महाराज मंडई लवकरच सुसज्ज, हायटेक अशी बनवली जाईल, असे आश्वासन आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिले. भाजी मंडई येथील भाजी आणि फळ विक्रेते, हातगाडीवाले, फेरीवाले, फास्टफूड विक्रेते यांनी आमदार गाडगीळ यांच्यासाठी प्रचार सभेत गाडगीळ बोलत होते. यावेळी माजी आमदार नितीन शिंदे, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार उपस्थित होते.
sangli vidhansabha bjp news : शिवाजी मंडई हायटेक करणार सुधीर गाडगीळ
आमदार गाडगीळ म्हणाले, माजी आमदार स्वर्गीय संभाजी पवार यांच्यामुळे मी राजकारणात आलो. भारतीय जनता पक्षाचा शहर जिल्हाध्यक्ष म्हणून माझी निवड आप्पानीच केली होती. त्यांच्या कार्याचा आदर्शसमोर ठेवून भाजी विक्रेते, फळ विक्रेते आणि फेरीवाले यांना बरोबर घेऊनच मी सांगलीच्या विकासासाठी काम करीत आहे. त्यामुळे भाजी मंडई अधिकाधिक चांगली करणार आहे. शहरातील भाजीविक्रेते फळ विक्रेते, फास्टफूडवाले, फेरीवाले यांना जास्तीत जास्त सुविधा कशा मिळतील, याकडे लक्ष देऊ.
पृथ्वीराज पवार म्हणाले, आप्पा ज्याप्रमाणे भाजी विक्रेते,फळ विक्रेते, फेरीवाले यांच्या प्रश्नांसाठी काम करीत त्याचप्रमाणे सुधीरदादा गाडगीळसुद्धा काम करीत आहेत. मतदार संघाचा सर्वांगीण विकास करणारे आणि गोरगरिबांची कामे आस्थेने करणारे आमदार म्हणून त्यांची राज्यात ओळख आहे. गोरगरीब, झोपडपट्टीवासीय, रस्त्यावरचे विक्रेते यांना मदत करण्यासाठी दादा नेहमीच पुढे असतात. त्यामुळे त्यांना आपण पुन्हा एकदा भरघोस मताधिक्याने विजयी करायचे आहे.
यावेळी स्मिता पवार, विजय साळुंखे, भाजी विक्रेते व फेरीवाले संघटनेचे अध्यक्ष श्याम हिंदुराव कोकरे, मीना विष्णू चौगुले, आशा कोकरे, प्रकाश माळी, गजू नांदरेकर, राहुल कोकरे, सचिन वाकसे, राधिका सप्रोजी, जयश्री भोसले, सविता कटरे, अजित राजोबा, लता कांबळे तसेच फेरीवाले, भाजी विक्रेते, हातगाडीवाले, फळ विक्रेते उपस्थित होते.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.