rajkiyalive

SANGLI VIDHANSABHA : काँग्रेसचे वर्चस्व मात्र भाजपचा बालेकिल्ला

जनप्रवास । अनिल कदम

SANGLI VIDHANSABHA : काँग्रेसचे वर्चस्व मात्र भाजपचा बालेकिल्ला सांगली ः लोकसभेचा आखाडा निश्चित झाल्याने रणधुमाळीला वेग येत आहे. या निवडणुकीत सांगली विधानसभेची भूमिका महत्वाची ठरेल. महानगरपालिका असो अथवा नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. मात्र त्यानंतर भाजपने आपला बालेकिल्ला बनविला. राज्याचे लक्ष लागलेल्या सांगली लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे विशाल पाटील यांचा बंडामुळे महाविकास आघाडीची कोंडी झाली. भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनीही सांगलीत मताधिक्य घेण्याचा चंग बांधला आहे.

SANGLI VIDHANSABHA : काँग्रेसचे वर्चस्व मात्र भाजपचा बालेकिल्ला

संजयकाका, विशाल, चंद्रहार पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढत

महाविकासकडून शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांनी राष्ट्रवादीच्या मदतीने जोर लावल्याने यंदाची निवडणूक प्रतिष्ठेची होत आहे.
सांगली विधानसभा मतदारसंघ पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये काँग्रेसचेच वर्चस्व राहिले. मात्र गेल्या दहा वर्षात हा बालेकिल्ला ढासळला आहे. भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ हे सलग दोनवेळा विजयी झाले.

त्यामुळे मतदारसंघात भाजपची ताकद जास्त आहे.

या परिस्थितीत काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांना काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी मिळेल, अशी आशा होती, परंतु महाविकास आघाडीतून शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी मिळाली. नाराज असलेल्या विशाल पाटील यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. भाजपने पुन्हा विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांच्यावर विश्वास दाखवला. या तिरंगी लढतीत सांगली विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधानसभा मतदारसंघात सांगली शहरासह ग्रामीण भागातील काही गावांचा समावेश आहे.

परंतु सांगली शहरातील सर्वाधिक मतदार आहेत. काँग्रेसचे बंडखारे विशाल पाटील यांचे वास्तव्य सांगलीत आहे, याशिवाय त्यांचा मोठा गट आहे. विशाल यांच्यासोबत जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील आहेत, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज सरगर हे त्यांच्यासोबत प्रचारात सक्रिय आहेत. शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे विशाल यांना उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशिल राहिले. परंतु तिकीट मिळाले नाही. पाटील हे उघडपणे विशाल यांच्यासोबत येण्याची शक्यता कमी आहे.

काँग्रेसला तिकीट न मिळाल्याने पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

महापालिकेतील पक्षाचे माजी नगरसेवकही विशाल यांच्यासोबत सक्रिय राहून कामाला लागले आहेत. ग्रामीण भागातही काँग्रेसचे कार्यकर्ते अपक्ष विशाल यांच्यासोबत दिसत आहेत. त्यामुळे काँग्रेसने विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केल्याचे दिसते. अपक्ष पाटील यांच्यासोबत काही सामाजिक संघटनाही कार्यकरत आहेत.

भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी हॅटट्रिेक साधण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली

सांगलीत मताधिक्य घेण्याचे टार्गेट आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री सुरेश खाडे यांनीही सांगलीच्या विकासासाठी संजयकाकांची गरज व्यक्त केली. सांगली विधानसभा मतदारसंघ लक्ष केले आहे. विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ, लोकसभा प्रमुख शेखर इनामदार, माजी आमदार दिनकर पाटील, नितीन शिंदे, भाजपा किसान सभेचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांच्यासह भाजपच्या माजी नगरसेवकांना सोबत घेवून जोरदार फिल्डिंग लावली जात आहे.

उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगलीत ठिकठिकाणी बैठका घेवून भाजपसाठी जोर लावला आहे.

त्यांच्याकडून काही नाराजांची मनधरणी करण्यात आल्याची चर्चा आहे. याशिवाय संजयकाकांनी पै-पाहुण्यांच्या मदतीने यंत्रणा राबवित आहेत. ग्रामीण भागात अरविंद तांबवेकर, राहुल सकळे यांच्यामार्फत भाजपकडून प्रचाराला गती दिली जात आहे.

महाविकास आघाडीकडून सेनेचे चंद्रहार पाटील यांनीही प्रचाराला सुरुवात केली आहे.

आघाडीत फूट पडल्यसाने सेनेला काँग्रेसकडून मदत मिळण्याची शक्यता कमीच आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून प्रचार यंत्रणेला बळ दिले जात आहे. मात्र राष्ट्रवादीत फूट पडली असल्याने अनेक नगरसेवक विरोधात गेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद कमी झाली आहे. परंतु शिवसेनेने स्वतःच्या पदाधिकार्‍यांच्या मदतीनेही गोळाबेरीज करण्यास सुरुवात केली आहे. सांगली विधानसभा मतदारसंघात मताधिक्य घेईल, तोच खासदार बनेल, असे गणित मांडल्याने सर्वांनीच सांगली लक्ष बनवले आहे.

विधानसभेला मात्र काँग्रेसच्या विरोधात कौल

सांगली विधानसभा मतदारसंघात वेळोवेळी काँग्रेसच्या विरोधात कौल मिळाला आहे. केवळ 1999 मध्ये दिनकर पाटील यांना काँगे्रसच्या तिकीटावर निवडून आले होते. 1990 व 1995 मध्ये जनता दलाकडून स्वर्गीय संभाजी पवार आमदार झाले होते. 2009 मध्ये भाजपकडून संभाजी पवार, तर 2014 आणि 2019 मध्ये भाजपकडून सुधीर गाडगीळ यांनी सलग दोनवेळा आमदारकी मिळवली. याशिवाय 2004 मध्ये माजी मंत्री स्वर्गीय मदनभाऊ पाटील यांनी अपक्ष म्हणून विजय मिळविला होता. गेल्या तीन दशकात काँग्रेसला केवळ एकवेळा संधी मिळाली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज