rajkiyalive

savkar madnaik news : चळवळीचा दीप राजकारणाच्या माळेत

dineshkumar aitawade 9850652056
savkar madnaik news : चळवळीचा दीप राजकारणाच्या माळेत: शेतकऱ्यांच्या संघर्षात खारवलेल्या मातीतून उगम पावलेले, ‘स्वाभिमानी’ या आंदोलनाच्या नाभीवरून ज्या नेत्याने आपल्या कर्तृत्वाची पताका फडकवली, असे सावकर मादनाईक आता नव्या राजकीय पर्वाची उधळण करीत आहेत. काळाच्या प्रवाहात त्यांनी आपली स्वतंत्र वाट निवडत भाजपच्या वाटेवर पाऊल टाकले आहे, अशी संकेतध्वनी राजकीय वर्तुळात घुमू लागली आहे.

savkar madnaik news : चळवळीचा दीप राजकारणाच्या माळेत

 भाजपकडून ‘ग्रीन सिग्नल’ मिळाल्याचे संकेत

राजकारणाच्या रंगभूमीवर अनेकांनी प्रवेश केला, काही टिकले, काही लोपले. पण मादनाईक यांचा प्रवास हा केवळ निवडणुकांचा नव्हता, तो होता चळवळींचा, जनतेच्या हुंकारांचा आणि अन्यायाविरुद्धच्या उभारलेल्या आंदोलक स्वाभिमानाचा! स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या झेंड्याखाली त्यांनी शिरोळ तालुक्याच्या मातीला उर्जित केलं. आंदोलनांची मशाल घेत ते वारंवार रस्त्यावर उतरले, आणि जनतेसाठी संघर्षाचा आवाज बुलंद केला.

संघटनेतील पहिल्या फळीतील प्रभावशाली चेहरा म्हणून मादनाईक यांची ओळख

माजी खासदार राजू शेट्टी यांच्यानंतर संघटनेतील पहिल्या फळीतील प्रभावशाली चेहरा म्हणून मादनाईक यांची ओळख होती. मात्र, काळाच्या फेरबदलात विचारांचे सूर बदलले आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वेगळा मार्ग स्विकारण्याचे ठरवले. स्वाभिमानाच्या गाभाऱ्यातून बाहेर पडत त्यांनी सवतासुभा मांडला.

“आपण सर्वांनी मिळून मादनाईक यांना आमदार करूया,” अशी जाहीर हाक माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी दिली आणि तेव्हापासूनच मादनाईक यांच्या राजकीय भवितव्याविषयी चर्चा अधिकच रंगू लागली. महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांकडून मादनाईक यांच्या प्रवेशास ग्रीन सिग्नल मिळाल्याची कुजबूज आता स्पष्ट संकेतात परिवर्तित होत आहे.

savkar-madnaik-news-the-lamp-of-the-movement-is-in-the-garland-of-politics

शेतकऱ्यांच्या तळमळीतून घडलेला हा नेता आता नवे आयाम गाठण्याच्या तयारीत आहे. त्यांची चळवळीतली निष्ठा, जनतेतली लोकप्रियता आणि लढवय्या वृत्ती भाजपला तालुक्याच्या पातळीवर मजबूत करण्यास निश्चितच उपयुक्त ठरेल, हे वरिष्ठ नेतृत्वाने ओळखले आहे.

दोन वेळा विधानसभा निवडणुकीत अपयशाचा कडू प्याला पिऊनही मादनाईक यांनी संघर्षाचा झेंडा खाली ठेवला नाही. अशा या निष्ठावान कार्यकर्त्याच्या हातात आता भगवा झेंडा येण्याची शक्यता दाट झाली आहे. चळवळीतील ज्योत आता सत्तेच्या दीपमाळेत विलीन होणार की, आणखी एका नव्या लढ्याची सुरुवात होणार – हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज