rajkiyalive

vishal patil on almatti dam : अलमट्टी उंचीवाढीबाबत सरकारकडून दिशाभूल

महाराष्ट्र, आंध्र, तेलंगणाची उंचीला विरोध नाही : खा. विशाल पाटील

vishal patil on almatti dam : अलमट्टी उंचीवाढीबाबत सरकारकडून दिशाभूल : कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणाच्या उंची वाढीस जल लवादाने मान्यता दिल्यानंतर कृष्णा खोर्‍यातील कोणत्याच राज्याने त्याविरोधात केंद्र सरकारकडे तक्रार दाखल केलेली नाही. त्यामुळे याप्रकरणी कोणतीही स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा विषयच येत नाही, असा खुलासा केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने लेखी स्वरुपात दिल्याची माहिती खासदार विशाल पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. याप्रकरणी राज्य सरकार फक्त राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

vishal patil on almatti dam : अलमट्टी उंचीवाढीबाबत सरकारकडून दिशाभूल

खासदार पाटील म्हणाले, अलमट्टी धरणाची उंची वाढल्यास सांगली, कोल्हापूरसह कृष्णा आणि उपनद्यांना महापूर येऊन प्रचंड नुकसान होईल. त्यामुळे आलमट्टी धरणाची उंची वाढवली जाऊ नये. त्यावर फेरविचार केला जावा. त्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करावी, अशी मागणी तारांकित प्रश्नाव्दारे लोकसभेत केली होती. त्याला केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या सहीने लेखी उत्तर मिळाल्याचे खासदार पाटील यांनी आज पत्रकार परिषदेवेळी या संदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

सांगलीची अवस्था बीड जिल्ह्यासारखी नको

मी आलमट्टी धरणाच्या उंची वाढीला विरोधाची भूमिका संसदेत मांडली.

त्यावर समितीची मागणी केली, वास्तविक मंत्रालयातून मिळालेली माहिती आता धक्कादायक आहे. कारण, महाराष्ट्र सरकारने उंची वाढीच्या विरोधात प्रस्तावच सादर केलेला नाही. जल लवादाने उंची वाढीला मान्यता दिल्यानंतर महाराष्ट्रच काय तर कोणत्याच राज्याने (महाराष्ट्र, आंध्र, तेलंगणा) त्याला विरोध केलेला नाही. या प्रकरणात राज्य सरकार फक्त राजकारण करत असल्याचे दिसते. कर्नाटकात सध्या काँग्रेसचे सरकार आहे.

त्यामुळे या प्रकरणाला काँग्रेस विरुद्ध भाजप असा रंग देण्याचाही प्रयत्न दिसतो आहे. सरकारने त्याच्यावर हरकत घेणे आवश्यक असल्याचेही खा. पाटील यांनी सांगितले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज