rajkiyalive

SANGLI LOKSABHA : विजयाची हॅटट्रिक साधणार-संजयकाका पाटील

जनप्रवास । प्रतिनिधी
सांगली ः लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या दुसर्‍या यादीमध्ये विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली. जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून खासदारांविरोधात पक्षात गटबाजी उफाळून आली होती. त्यामुळे खासदारांच्या उमेदवारीबाबत संभ्रम निर्माण झाला होता, परंतु पक्षाने पुन्हा संधी दिल्याने खासदार पाटील यांचा हॅटट्रिकचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान महायुतीतील नेते, पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते सोबत असल्याने सांगलीत हॅटट्रिक मारणार असल्याचे खा. पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

SANGLI LOKSABHA : विजयाची हॅटट्रिक साधणार-संजयकाका पाटील

मागील आठवड्यात भाजपची पहिली यादी जाहीर झाली होती, त्यानंतर बुधवारी दुसर्‍या यादीमध्ये महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये सांगलीचा समावेश झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. जिल्ह्यात भाजपमधील एक गट संजयकाका पाटील यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी करीत होता. पालकमंत्री सुरेश खाडे हे खासदार संजयकाका यांच्या बाजुने आहेत. पण इतर अनेक नेते मंडळी काकांना विरोध दर्शविला होता. काही नेते काका सोडून कोणाला पण पक्षाने उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र सार्‍यांनाच धक्का देत पक्षाने पुन्हा विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांच्यावर विश्वास दाखविला.

भाजपकडून तिसर्‍यांदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खासदार संजयकाका पाटील बोलताना म्हणाले, प्रत्येक नेत्याची निवडणूक लढविण्याची इच्छा असते. त्यामुळे निवडणुकीसाठी कुणी तिकीट मागणे गैर नाही. माझ्याविरोधात कुणी तिकीट मागितले म्हणून मनात कोणताही राग, व्देष नाही. काही लोकांच्यामध्ये माझ्याबाबत गैरसमज झाला होता. माजी आमदार विलासराव जगताप आणि माझ्यामध्ये काही गैरसमज होते. मात्र आम्ही दोघांनी मागील आठवड्यात एकत्र बसून मतभेदावर पडदा टाकला आहे. माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्याशीही बोलणार आहे. माझ्या मनातही कटुता राहणार नाही.

निवडणुकीसाठी महायुतीतील नेते, पदाधिकारी यांच्यासह मतदारसंघातील कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. निवडणुकीत कुणीही विरोधात उभे राहिले तर आत्तापर्यंत केलेल्या विकासकामांच्या जोरावर हॅटट्रिक साधणार असल्याचे खासदार पाटील यांनी सांगितले.

लोकसभा प्रमुख शेखर इनामदार म्हणाले, जिल्ह्यात भाजपचे काम चांगले असून कोणतेही हेवेदावे नाहीत. पक्षात अनेक उलथापालथी होत असताना आम्हांला तिसर्‍यांदा संधी दिली. गेल्या दहा वर्षात पक्ष संघटन मजबूत झाल्याने सांगलीत विजयाची हॅटट्रिक साधू.

पक्षात तिकीट मागणे गैर नाही

निवडणूक लढविण्याची प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे निवडणुकीसाठी कुणी तिकीट मागणे गैर नाही. माझ्याविरोधात कुणी तिकीट मागितले म्हणून मनात कोणताही राग, व्देष नाही. यापुढेही माझ्या मनात कोणतीही कटुता राहणार नसल्याचे खासदार संजयकाका पाटील यांनी सांगितले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज