rajkiyalive

hatkanangale loksabha : हातकणंगलेत प्रस्थापितांविरोधात लढणारच

जनप्रवास । प्रतिनिधी
hatkanangale loksabha : हातकणंगलेत प्रस्थापितांविरोधात लढणारच : सांगली ः हातकणंगले लोकसभा मतदारसंघात 2019 पासून रयत क्रांती संघटनेने निवडणुकीची तयारी केली आहे. गतवेळी आम्ही युतीधर्म पाळला आहे. यंदा मात्र लोकसभा निवडणूक लढविण्यावर ठाम असून प्रस्थापितांविरोधात लढणारच असल्याची भूमिका माजी मंत्री व रयत क्रांतीचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी मांडली. महायुतीकडून उमेदवारी देण्यात यावी, या मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांची लवकरच भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

hatkanangale loksabha : हातकणंगलेत प्रस्थापितांविरोधात लढणारच

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटणार – सदाभाऊ खोत

रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून हातकणंगलेत मतदारसंघातील तालुक्यात कार्यकर्त्यांचे जाळे तयार केले आहे. तळागाळातील लोकांशी आम्ही नाळ जोडली होती. गतवेळीही आमची प्रस्थांपिताविरोधात लढण्याची तयारी होती, त्यावेळी आम्ही लोकसभा निवडणूक लढविण्याची मागणी करीत मतदारसंघ सोडण्याची मागणी केली होती. मात्र आम्हांला युतीधर्म पाळावा लागला होता. त्यावेळी प्रचारप्रमुख म्हणून मी स्वतः काम केले होते. शिवसेनेच्या उमेदवाराला विक्रमी मताधिक्क्यांनी निवडून आणण्यात मोलाचा वाटा उचलला होता. आता परिस्थिती बदलली आहे. यावेळी हातकणंगले मतदारसंघ रयत क्रांती संघटनेला दिला गेला पाहिजे, अशी संघटनेच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे.

खोत म्हणाले, आम्ही नेहमी विस्तापितांच्या बाजूनेंच राहिला आहे. मात्र राजकारणात प्रस्तापित घराणीच आमच्या मानगुटीवर बसत आहेत. त्यामुळे भविष्यात विस्तापित विरुद्ध प्रस्तापित लढाई अधिक तीव्र करणार आहोत. आम्ही महायुतीकडे हातकणंगलेची जागा रयत क्रांती संघटनेला मिळावी, अशी मागणी असताना दुर्देवाने त्याचा विचार होत नाही.

आम्ही रस्त्यावरची लढाई लढत सामान्य जनतेशी नाळ कायम ठेवली. आता या निवडणुकीत तरी हातकणंगलेची जागा आम्हाला मिळावी, अशी मागणी महायुतीकडे केली होती. मात्र पुन्हा आम्हाला डावलण्यात येत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आम्ही आता प्रस्तापितांचा प्रचार करणार करणार नाही. कार्यकत्यांची बैठक घेवून पुढील भुमिका निश्चित करु. तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना भेटून या जागेसंदर्भात चर्चा करणार असल्याचे माजी मंत्री खोत यांनी सांगितले.

 

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज