rajkiyalive

कडेगाव-पलूस विधानसभा मतदार संघात 62.50 टक्के मतदान.

कडेगाव : प्रतिनिधी
कडेगाव-पलूस विधानसभा मतदार संघात 62.50 टक्के मतदान. : कडेगाव-पलूस विधानसभा मतदारसंघात 285 मतदान केंद्रावर मंगळवारी अत्यंत शांततेत व चुरशीने मतदान पार पडले. यामध्ये महिला ,अबालवृद्ध ,तरुणांसह अपंगांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.या मतदारसंघात 62.50 टक्के मतदान झाले.

कडेगाव-पलूस विधानसभा मतदार संघात 62.50 टक्के मतदान.

मंगळवारी सकाळी 7 ला मतदारसंघात मतदान सुरू झाले.सकाळी मतदान अत्यंत संथ गतीने झाले. सकाळी 9 वा पर्यंत केवळ 3.92 टक्के मतदान झाले तर 11 वा पर्यंत केवळ 13.58 टक्के मतदान झाले. परंतु 11 नंतर मतदानाचा वेग वाढला दुपारी 1 वा पर्यंत 26.80 टक्के मतदान झाले तर दुपारी 3 वा पर्यंत 39.73 टक्के मतदान झाले.सायंकाळी 5 वाजेपर्यंत 50.44 टक्के मतदान झाले.

सायंकाळी 6 वाजता मतदान संपले तेंव्हा 62.50 टक्के इतके मतदान झाले.

पलूस-कडेगाव मतदार संघात एकूण 2 लाख 84 हजार 575 मतदार आहेत.यामध्ये 1 लाख 43 हजार 049 पुरुष तर 1 लाख 41 हजार 518 स्त्री आणि इतर 8 मतदारांचा समावेश आहे.दरम्यान दुपारी 3 वा पर्यंत 39.73 टक्के मतदान झाले.यामध्ये 1 लाख 30 हजार 60 मतदारांनी मतदानाचा हक्क बाजवला. सध्या कडक उन्हाळा सुरू आहे.अशा परिस्थितीत रखरखत्या उन्हात मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बूथ केंद्रावर चांगलीच गर्दी केल्याचे दिसून आली. मतदार उत्स्फूर्तपणे मतदानासाठी मतदान केंद्रावर पोहचले.

अबालवृद्ध व अपंगांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

अपंगांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर शासनाकडून व्हील चेअरची सोय करण्यात आली होती. तसेच नुकतेच आता मतदानाचा हक्क मिळवलेल्या तरुणांईने देखील आपले पाहिले मतदान उत्साहात केले. माजी कृषी व सहकार राज्यमंत्री आ. डॉ. विश्वजीत कदम यांनी पत्नी स्वप्नाली कदम व आई विजयमाला कदम यांच्या समवेत सेानसळ ता कडेगाव येथे मतदानाचा हक्क बजावला तर आ.मोहनराव कदम ,युवा नेते शांताराम कदम यांनी चिंचणी ता कडेगाव येथे मतदान केले.

भाजपचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख , माजी जिल्हा परिषदेचे सदस्य संग्रामसिंह देशमुख यांनी कडे पूर येथे आपला मतदानाचा हक्क बजावला .डॉ.जितेश कदम यांनी सोनसळ येथे मतदान केले. दरम्यान यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी रणजित भोसले , सहाय्यक निवडणूक निर्णय अजित शेलार दीप्ती रीटे,नायब तहसीलदार सागर कुलकर्णी आदींसह मतदान अधिकारी व कर्मचार्‍यांनी मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज