rajkiyalive

कवठेपिरानमध्ये भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक

अपघातात वृद्ध गंभीर जखमी.

कवठेपिरानमध्ये भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक : सांगली : मिरज तालुक्यातील कवठेपिरान ते दुधगाव कडे जाणार्‍या रस्त्यावर चालत निघालेल्या वृद्धाला भरधाव दुचाकीने पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात वृद्ध गंभीर जखमी झाला. अपघातानंतर अज्ञात दुचाकीस्वाराने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पलायन केले. सदरचा अपघात हा सोमवार दि. 12 मे रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास झाला. याप्रकरणी कृष्णात धोंडीराम यादव (वय 42 रा. कवठेपिरान) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या अपघातात धोंडीराम नाना यादव हे गंभीर जखमी झाले आहेत.

कवठेपिरानमध्ये भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक

याबाबत अधिक माहिती अशी की, जखमी धोंडीराम यादव हे आपल्या कुटुंबीयांसह मिरज तालुक्यातील कवठेपिरान गावातील चौथाई गल्ली येथे राहतात. दररोज पहाटे ते मॉर्निंग वॉक साठी जात असतात. सोमवार दि. 12 मे रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास नेहमी प्रमाणे ते फिरण्यासाठी घराबाहेर पडले. कवठेपिरान ते दुधगाव कडे जाणार्‍या मार्गावर ते चालत निघाले होते.

धोंडीराम यादव यांना पाठीमागून जोराची धडक दिली

यावेळी भरधाव वेगात एक अज्ञात दुचाकीस्वार आला. त्याने धोंडीराम यादव यांना पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात यादव यांच्या खुब्याला गंभीर दुखापत होऊन फॅकचर झाले. अपघातानंतर दुचाकीस्वाराने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पलायन केले. अपघातानंतर यादव यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी कृष्णात यादव यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वारा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कवलापूर येथील घराच्या खिडकीतून 60 हजारांचा लॅपटॉप केला लंपास.

सांगली : मिरज तालुक्यातील कवलापूर येथे भाड्याने राहत असलेल्या विद्यार्थ्याच्या घरातील 60 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप अज्ञात चोरट्याने लंपास केला. सदर चोरीची घटना ही मंगळवार दि. 14 मे रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.

कवलापूर मधील एका घरात तो भाड्याने राहतो.

या प्रकरणी साहील सोमनाथ सहाणे (वय 22 रा. चिखली जि. अहमदनगर सध्या कवलापूर) याने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. साहिल सहाणे हा मूळचा अहमदनगर जिल्हयातील चिखलीचा असून सध्या बुधगाव येथील कॉलेज मध्ये शिक्षण घेत आहे. कवलापूर मधील एका घरात तो भाड्याने राहतो.

मंगळवारी साहिल हा कॉलेजला गेला होता.

यावेळी अज्ञात चोरट्यांनी घरच्या उघड्या खिडकीतून 60 हजारांचा लिनोव्हा कंपनीचा लॅपटॉप लंपास केला. सायंकाळी सदर चोरीची घटना निदर्शनास येताच साहिल याने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज