rajkiyalive

SANGLI SAMDOLI : सुरेश पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

SANGLI SAMDOLI : सुरेश पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा शांतीसागर को. ऑप. के्रडीट सोसायटीचे संस्थापक चेअरमन, माजी जिल्हा परिषद सुरेश पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमानी साजरी करण्यात आली.

SANGLI SAMDOLI : सुरेश पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

सकाळी 9 वाजता येथील संस्थेच्या सभागृहात विविध मान्यवरांच्या उपस्थित केक कापण्यात आला. यावेळी राजवर्धन पाटील, राजू कवठेकर, एस. के. पाटील, अजित पाटील, मॅनेंजर पवन पाटील संस्थेचे सर्व संचालक, कर्मचारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर येथील आष्टा पीपल्स बँकेतही त्यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी उद्योजक प्रशांत अवधूत कसबे डिगज, संजय सावंत हरिपूर यांनीही त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

येथील शांतीसागर वनराईमध्ये वाढदिवसानिमित्त त्यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अमोल पाटील, जितेंद्र पाटील, राजेंद्र पाटील, अनिल पाटील, दिलीप पाटील ,कृषी सहाय्यक दिलीप मिरेकर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन समडोळी स्पोर्ट्स असोसिएशन चे पदाधिकारी देशभूषण पाटील, रवींद्र पाटील, सुनील बेले, सुरेश यलमार, उमाजी मंडले, संजय हेरवाडे यांनी केले होते.
वाढदिवसानिमित्त सुरेश पाटील यांना प्रत्यक्ष भेटून, दूरध्वनीवरूनही अनेकांनी शुभेच्छा दिल्या.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज