1995 ची पुनरावृत्ती टाळणे आवश्यक:
जनप्रवास । शरद पवळ
SANGLI : काँग्रेसला 25 वर्षानंतर विजयाची संधी; पण उमेदवारीवरून संघर्ष कायम : सांगली विधानसभा निवडणुकीत उमेदवारीवरून काँग्रेस अंतर्गत होत असलेला संघर्ष काँग्रेसच्या मुळावर जाते आणि भाजपच्या पथ्यावर पडतो. त्यामुळे 1999 नंतर या मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा फडकला नाही. सांगली लोकसभेची कामगिरी आणि नेत्यांची झालेली एकी पाहता विधानसभा भाजपकडून काबीज करण्याची संधी 25 वर्षांनंतर काँग्रेसला चालून आली आहे. पण काँग्रेसमध्ये शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई मदन पाटील यांच्या उमेदवारीवरून जोरदार संघर्ष सुरू आहे. त्यामुळे 1995 ची बंडखोरीची पुनरावृत्ती टाळणे आवश्यक आहे.
SANGLI : काँग्रेसला 25 वर्षानंतर विजयाची संधी; पण उमेदवारीवरून संघर्ष कायम
SANGLI : काँग्रेसला 25 वर्षानंतर विजयाची संधी; पण उमेदवारीवरून संघर्ष कायम : सांगली लोकसभेबरोबर सांगली विधानसभेचा गड करण्याचा प्रयत्न माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांचा नेहमी असायचा. 1952 पहिल्या निवडणुकीपासून वसंतदादांची सांगली लोकसभा मतदार संघावर पकड आहे. 1952, 57, 62. 78 आणि 1985 मध्ये स्वत: वसंतदादा येथून निवडून आले. 1967 मध्ये कॉग्रेसकडून वसंतदादांनी आप्पासाहेब बिरनाळे यांना तर 1972 मध्ये प्रा. पी. बी. पाटील यांना काँग्रेसकडून निवडून आणले होते.
1978 साली विधानसभेची निवडणूक स्व. वसंतदादा पाटील यांनी जिंकली होती.
SANGLI : काँग्रेसला 25 वर्षानंतर विजयाची संधी; पण उमेदवारीवरून संघर्ष कायम : त्यांनी जनता पार्टीच्या उमेदवाराचा पराभव केला होता. 1980 ला मात्र त्यांनी शालिनीताई पाटील यांना उमेदवारी दिली आणि निवडून आणले. तर 1985 साली पुन्हा स्व. वसंतदादा पाटील निवडून आले. त्यानंतर दादांची राजस्थानच्या राज्यपालपदी निवड झाल्याने त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे पोटनिवडणूक लागली. यावेळी झालेल्या पोटनिवडणुकीत पै. संभाजी पवार पहिल्यांदा आमदार झाले.
1990 च्या निवडणुकीत जनता दलाचे संभाजी पवार यांनी विष्णूअण्णा पाटील यांचा पराभव केला.
त्यानंतर पुन्हा 1995 च्या निवडणुकीत जनता दलाकडून पुन्हा संभाजी पवार रिंगणात होते. यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून प्रकाशबापू पाटील यांनी निवडणूक लढवली होती. यावेळी दादा घराण्यात बंडखोरी झाली. मदनभाऊ पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
काँग्रेसचे प्रकाशबापू पाटील व मदनभाऊ पाटील यांच्यात मतांची विभागणी झाली.
SANGLI : काँग्रेसला 25 वर्षानंतर विजयाची संधी; पण उमेदवारीवरून संघर्ष कायम : संभाजी पवार यांना 51 हजार मते पडली होती. तर प्रकाशबापू पाटील व मदनभाऊ पाटील यांच्या मतांची बेरीज ही 66 हजाराच्यावर होती. या निवडणुकीत पुन्हा संभाजी पवार विजयी झाले. त्यांनी प्रकाशबापू पाटील यांचा 11 हजार 767 मतांनी पराभव केला. यानंतर काँग्रेसने संधी साधली. माजी आमदार दिनकर पाटील यांना 1999 च्या निवडणुकीत उमेदवारी दिली गेली. दिनकर पाटील यांनी संभाजी पवार यांचा 23 हजार मतांनी पराभव केला. काँग्रेसचा गड पुन्हा दिनकर पाटील यांच्या रूपाने ताब्यात आला.
2004 च्या निवडणुकीत पुन्हा वारे फिरले. मदन पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली नाही.
त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसकडून दिनकर पाटील तर भाजपकडून संभाजी पवार निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकीत दादा घराण्याची एकी झाली. प्रकाशबापू पाटील यांनी मदनभाऊ पाटील यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. ‘मै हूँ ना’ चा नाराज दिला आणि मदन पाटील विजयी झाले. त्यांना 66 हजार 563 मते मिळाली. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संभाजी पवार यांना 39 हजार 796 मते घेऊन दुसर्या स्थानावर होते. शेवटच्या वर्षी मदनभाऊंची यांची मंत्रीमंडळात वर्णी लागली.
2005 मध्ये प्रकाशबापू पाटील यांचे निधन झाले. दादा घराण्यात झालेली एकी पुन्हा फिस्कटली.
अंतर्गत वाद सुरू झाला. 2009 च्या निवडणुकीत मदनभाऊ पाटील काँगे्रेसच्या चिन्हावर लढले. मात्र संभाजी पवार यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर 2014 च्या निवडणुकीत आ. सुधीर गाडगीळ यांनी मदनभाऊंचा पराभव केला. 2015 मध्ये मदनभाऊ पाटील यांचे निधन झाले. त्यानंतर काँग्रेस पक्षाने 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिली. पण या निवडणुकीत देखील काँग्रेसला अपयश आले. आमदार सुधीर गाडगीळ यांनी पृथ्वीराज पाटील यांचा पराभव केला.
आता तब्बल 25 वर्षानंतर काँग्रेसला या मतदारसंघात संधी चालून आली आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघ दहा वर्षांनी काँग्रेसने पुन्हा ताब्यात घेतला आहे. सांगली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे विशाल पाटील यांना 19 हजाराचे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे सांगलीत काँग्रेसला विजयाची अपेक्षा आहे. मात्र उमेदवारीवरून काँग्रेसचा संघर्ष सुरू झाला आहे. जयश्रीताई पाटील व पृथ्वीराज पाटील उमेदवारीसाठी दावेदारी करत आहेत. लढण्याची तयारी देखील दोन्ही गटाकडून केली जात आहे. त्यामुळे 1995 ची पुनरावृत्ती घडण्याची शक्यता आहे. दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळाली अन् दुसरा अपक्ष लढता तर पुन्हा भाजपचा फायदा होण्याची दाट शक्यता आहे.
सांगली विधानसभा मतदारसंघातील आमदार
1952- वसंतदादा पाटील (भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेस)
1957 – वसंतदादा पाटील (भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेस)
1062 -वसंतदादा पाटील (भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेस)
1067 – आप्पासाहेब बिरनाळे (भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेस)
1972 – प्रा. पी. बी. पाटील (भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेस)
1978 – वसंतदादा पाटील (भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेस)
1980- शालिनीताई पाटील (भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेस)
1985- वसंतराव बंडूजी पाटील (भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेस)
1986- (पोटनिवडणूक)- संभाजी पवार
1990- संभाजी पवार (जनता दल)
1995- संभाजी पवार (जनता दल)
1999- दिनकर पाटील (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
2004- मदनभाऊ पाटील (अपक्ष)
2009- संभाजी पवार (भाजप)
2014- सुधीर गाडगीळ (भाजप)
2019- सुधीर गाडगीळ (भाजप)
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.